Air India At Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपावर एअर इंडियाची एन्ट्री, गोवा - लंडन आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा होणार शुभारंभ

एअर इंडिया मोपा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणारी पहिली कंपनी आहे.

Pramod Yadav

Manohar International Airport At Mopa Goa

अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या मोपा येथील मनोहर विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा लवकरच शुभारंभ होणार आहे. एअर इंडियाकडून ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली जाणार आहे. गोवा ते लंडन अशी ही विमानसेवा असेल.

एअर इंडियाच्या गोवा लंडन विमानाने 21 जुलैपासून मोपा विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे. आठवड्यातून तीन वेळा मोपा ते गॅटविक, लंडन दरम्यान विमानसेवा सुरू राहील. एअर इंडिया मोपा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणारी पहिली कंपनी आहे.

गृह मंत्रालयाच्या वतीने मंगळवारी (दि.11) अधिसूचना प्रसिद्ध करत, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला वैध कागदपत्रासह अधिकृत प्रवेश आणि गमन यासाठी तपासणी करण्याची परवानगी दिली आहे.

मोपा विमानतळावर अद्ययावत ‘चेक ईन’; सेल्फ सर्व्हिस

 मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या प्रवास सुकर होण्यासाठी 'चेक-ईन’ प्रक्रिया अद्ययावत केली आहे. या सेवेमुळे प्रवाशांचे बॅगांसह अन्य साहित्य अल्पावधीत तपासणी होऊन अॅटोमेटिक चेनद्वारे योग्य स्थळी पोहोचते.

जीएमआर गोवा संचालित या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक तपासणी सुविधांमुळे प्रवाशांच्या अनुभवात लक्षणीय वाढ झाली आहे. विमानतळाने सुमारे 40 टक्के प्रवाशांनी सेल्फ-सर्व्हिस बॅग ड्रॉप्स आणि 47 टक्के कॉमन यूज सेल्फ सर्व्हिस किओस्कचा प्रभावी वापर केला आहे, ज्यामुळे चेक-इन प्रक्रियेत क्रांती घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT