Manohar Airport  Dainik Gomantak
गोवा

Manohar Airport: ‘टॅक्सी ॲप’ वरून गोंधळ, प्रवाशांची कोंडी

मोपाहून महागडा प्रवास- ‘कदंब’चे दरही अधिकच, सुधारणा करण्याच्या सूचना

दैनिक गोमन्तक

Manohar Airport: मोपा विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, तसेच योग्य दरात त्यांना आपल्या पसंतीच्या वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल, यासाठी गोवा सरकारकडून गोवा टॅक्सी ॲप सुरू करण्यात आले आहे. परंतु ॲप सुरू होऊन अवघ्या काही दिवसांत वादाच्या भोवऱ्यात सापडले.

मोपा ते बाणावली प्रवास केलेल्या प्रवाशांना चार हजार शुल्क लागू झाल्याचे बिल व्हायरल झाले आहे. त्यात कदंब बस सेवा देखील महाग असल्याने यात प्रवाशांची कोंडी झाली आहे.

गोवा टॅक्सी ॲप सेवा सुरू झाल्यास सवलतीच्या दरात प्रवास करता येईल, असा समज प्रवाशांनी केला होता. परंतु लगेच हा गैरसमज होता, असे त्यांच्या लक्ष्यात आले आहे. यावरून आता वेगळा वाद निर्माण झाला असून व्हायरल झालेले बिल हे अधिसूचित केलेल्या दरानुसार होते, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच ॲप तयार केलेल्या गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला (जीएएल) यात सुधारणा करण्याची सूचना दिल्याचे खंवटे यांनी सांगितले आहे. मात्र गोवा ॲपच्या मूळ उद्देशावर आता प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पणजी ते मडगाव कदंब महामंडळाच्या शटल सेवेसाठी प्रवास शुल्क 50 रुपये आहे, परंतु मोपा ते मडगाव मार्गावर 400 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

एक किंवा दोन जणांसाठी हे शुल्क परवडणारे असले तरी मोठ्या गटात आलेल्यांसाठी हे टॅक्सीमध्ये गेल्याप्रमाणे होणार आहे.

दहा मिनिटांच्यावर राहिल्यास पार्किंगशुल्क 500 रुपये द्यावे लागेल.

  • विमानतळावर गर्दी होऊ नये, यासाठी काही नियम केले गेले आहे. मोपा विमानतळावर देखील हेच नियम लागू केले जातील. विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा नेण्यासाठी येणाऱ्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांना पार्किंग शुल्क अनिवार्य केले आहे.

  • प्रवाशांना नेण्यासाठी येणाऱ्या खासगी चारचाकीला पहिली 5 मिनिटे मोफत आहेत. 5-10 मिनिट थांबल्यास 50 रुपये आणि 10 मिनिटापेक्षा अधिक वेळेला 500 रुपये शुल्क आकारले जाईल.

  • तर नेण्यासाठी येणाऱ्या व्यावसायिक चारचाकीला पहिल्या 5 मिनिटांसाठी 50 रुपये आणि 5 मिनिट ओलांडल्यास 500 रुपये शुल्क आहे. बस आल्यास प्रत्येक 30 मिनिटांसाठी एक हजार आकारले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT