Maninder Attari will definitely be arrested Dainik Gomantak
गोवा

मनिंदर अत्तारीला निश्चित अटक होणार!

न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

दैनिक गोमन्तक

पणजी: येथील आयकर कार्यालयातील महिला कर्मचारी लैंगिक अत्याचारप्रकरणातील मख्य संशयित असलेला आयकर निरीक्षक मनिंदर सिंग अत्तारी याचा अटकपूर्व जामीन अर्ज द्रुतगती न्यायालयाने फेटाळला. या गुन्ह्याच्या सखोल चौकशीसाठी संशयिताची कोठडी आवश्‍यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

पीडित महिलेने पणजी पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीत मनिंदर सिंग अत्तारी याने तिला मोबाईलवरून व्हॉटस्अपवर पाठविलेले अश्‍लिल संदेश याची माहितीच तक्रारीत सोबत जोडली आहे. त्याशिवाय तो मोबाईल त्याचाच असल्याचा पुरावा पोलिसांनी सुनावणीवेळी सादर केला.

तपासकाम प्राथमिक टप्प्यात असल्याने सीसी टीव्ही कॅमेरा फूटेज तसेच डीव्हीआर पोलिसांनी आयकर खात्याकडे मागितली आहे अजून मिळालेली नाही. संशयित आयकर कार्यालयात निरीक्षक पदावर असल्याने तो कार्यालयात पीडित महिलेबरोबर काम करणाऱ्यांवर दबाव व दडपण आणण्याची शक्यता असून तपासकामात अडथळा येऊ शकतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी आवश्‍यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील सुषमा मांद्रेकर यांनी केला. त्यांनी मांडलेली बाजू न्यायालयाने उचलून धरत संशयिताचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

दरम्यान, पीडित महिलेने इतर दोघा संशयितांविरुद्ध केलेले आरोप हे जामीनपात्र होते. त्यामुळे संशयित आदित्य वर्मा व दिपक कुमार या दोघांना न्यायालयाने कालच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. हे दोघेही अश्‍लिल टोमणे मारण्याबरोबरच वाईट नजरेने पाहत होते असे तक्रारीत नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: विश्वविक्रम! अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा पार

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

SCROLL FOR NEXT