Accident in Bicholim Dainik Gomantak
गोवा

धावत्या कारमोटारगाडीवर आंब्याची फांदी कोसळली!

मुळगावात अपघात; सुदैवाने दोघेजण सुखरूप बचावले

दैनिक गोमन्तक

डिचोली : धावत्या मोटारगाडीवर आंब्याची भलीमोठी फांदी कोसळण्याची घटना डिचोली-अस्नोडा रस्त्यावर घडली. हा अपघात बुधवारी पहाटे शिवोलकरवाडा-मुळगाव येथे घडला. सुदैवाने मोटारगाडीतील चालकासह दोघेजण सुखरूप बचावले. या मोटारीत म्हापसातील दोघेजण होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या अपघातासंबंधी उपलब्ध झालेली माहिती अशी की, GA-03-6785 या क्रमांकाची मोटारगाडी अस्नोड्याच्या दिशेने जात होती. शिवोलकरवाडा-मुळगाव येथे समोरून येणाऱ्या MH-10- CR- 1224 या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकच्या टपाची धडक आम्रवृक्षाच्या मोठ्या फांदीला बसली. त्याबरोबर फांदी मोडून मोटारगाडीच्या दर्शनी भागावर कोसळली. यात मोटारगाडीच्या दर्शनी भागाची मोडतोड झाली.

या घटनेत मोटारीचा चालक किरकोळ जखमी झाला. ही फांदी जर मोटारगाडीच्या टपावर कोसळली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. डिचोली अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी फांदी हटवून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT