Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Mango Flowering : नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाची तमा न बाळगता आंबा मोहरला आहे. गेल्या वर्षी आंबा रूसला होता.

Sameer Amunekar

काणकोण: नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाची तमा न बाळगता आंबा मोहरला आहे. गेल्या वर्षी आंबा रूसला होता. डिसेंबरच्या सुरुवातीलाच हुडहुडी भरणारी थंडी पडल्याने यंदा आंब्याला बऱ्यापैकी मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. काही भागात काजू बोंडूही धरण्यास सुरुवात झाली आहेत.

काणकोणात ३५०० हेक्टर जागेत काजू लागवडीखाली आहे. पैकी बहुतेक जागेत जूनी काजूची झाडे आहेत. ती सेंद्रीय असून काणकोणातील सर्व काजू ऑर्गेनिक असल्याचे साहाय्यक विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी सांगितले. सरासरी दरवर्षी १९०० टन काजू बियांचे पीक येते, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात थंडीचा जोर वाढत आहे, त्याचा काही प्रमाणात फायदा काजू पिकाला होणार आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक काजू पीक येण्याची शक्यता आहे, असे सर्वणकर यांनी सांगितले.

काजूला ऑर्गेनिक नामांकन द्या

काणकोण, केपे, सांगे व उर्वरित राज्यातील काजू पूर्णपणे ऑर्गेनिक आहेत. या भागातील काजू बागायतदार काजू उत्पादनासाठी कोणत्याच प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करीत नाहीत. त्यामुळे काजूला ऑग्रेनिक नामांकन मिळणे आवश्‍यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT