Mango Dainik Gomantak
गोवा

मडगावात आंब्यांची आवक वाढली

दर झाला स्वस्त: 300 ते 500 रुपये डझन दराने विक्री

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मडगाव येथील पिंपळापेड येथे दरवर्षी आंब्याच्या मोसमात पहाटे आंबा विक्रेत्यांचे घाऊक मार्केट सुरू होत असते. आंब्याचा मोसम मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो, पण यंदा अवकाळी पावसामुळे सुरवातीला आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात झाले नाही, तरीही आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून मडगावात वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली आहे.

मडगाव हे आंब्याचे घाऊक मार्केट असल्यामुळे मडगाव तसेच परिसरातील लोक आंबा विकत घेण्यासाठी येथे येतात. तसेच वास्को, फोंडा येथीलही आंबा विक्रेते येथे येऊन आंबे घेऊन जातात.

यंदा मडगावात मुसराद, शावियेर, मानकुराद, मांगिलाल या प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. सुरवातीला दर जास्तच होते. लोकांच्या खिशाला परवडणारे नव्हते, पण आता 300 ते 500 रुपये डझनपर्यंत आंबे मिळायला लागले आहेत, असे आंब्याचे घाऊक विक्रेते नरेंद्र नाईक यांनी सांगितले. चांगला आंबा 700 रुपये डझनपर्यंत मिळू लागला आहे. त्यामुळे सामान्या लोकांच्या खिशाला परवडेल अशी आंब्यांचा दर आहे, असे नाईक यांनी सांगितले. लोकांना आणखी आठ ते दहा दिवस आंबे खायला मिळतील, नंतर आंब्याची आवक कमी होईल, असेही नाईक म्हणाले.

उदय नाईक या विक्रेत्याने सांगितले, की यंदा आंब्याचा आकार छोटा आहे. आंब्याचे जे पहिले फूल असते, त्यातून आम्हाला जास्त आंबे मिळाले नाहीत. मात्र, हे आंबे दुसऱ्या फुलाचे आहेत व पीकही भरपूर झाले. जेमतेम आणखी दहा दिवस लोकांना कमी दरात आंबा खायला मिळेल. एक मात्र खरे आंबे विकत घेताना सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवते व त्याचा आनंद आम्हालाही होत आहे. मडगावमध्ये दर दिवशी कमीत कमी आंबे भरून 500 च्या वर पाटले येत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT