NIO study Mandovi Dainik Gomantak
गोवा

गोव्याची जीवनवाहिनी धोक्यात! शहरी सांडपाणी, कॅसिनोचा मांडवीला विळखा; NIOच्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Mandovi river pollution: गोव्याची जीवनवाहिनी मानली जाणारी मांडवी नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्याची जीवनवाहिनी मानली जाणारी मांडवी नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. राजधानीतील मांडवी नदीच्या प्रदूषणाचे मुख्य स्रोत शहरी सांडपाणी, कॅसिनो आणि नदीकिनारी असलेल्या रेस्टॉरंट्समधून सोडले जाणारे सांडपाणी हेच असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. आता दोना पावला येथील सीएसआयआर-एनआयओ (CSIR-NIO) संस्थेने केलेल्या एका अभ्यासामध्येही ही बाब स्पष्ट झाली आहे.

प्रदूषण नियंत्रक मंडळाचा अहवालही धोक्याची घंटा वाजवतो!

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या वार्षिक अहवालात नद्या आणि अरबी समुद्रातील पाण्याच्या प्रदूषणाची पातळी वाढल्याचे नमूद केले आहे.

त्यामुळे, स्थानिक प्राधिकरणे आणि राज्य सरकारच्या विभागांकडून शहरी कचरा नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी काही प्रयत्न केले गेले असले तरी, ते किती प्रभावित करू शकतील याचा अंदाज लावता येत नाही

एनआयओने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या अभ्यासामध्ये घरांतून, म्हादईच्या काठावरील व्यावसायिक आस्थापनांमधून आणि मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींमधून (कॅसिनो आणि क्रूझ बोटी) सोडले जाणारे सांडपाणी नदीतील सूक्ष्म-प्लास्टिकमध्ये वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

दूषित स्त्रोत आणि दुर्लक्षित समस्या

पणजीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राजधानीतील सर्व सांडपाणी प्रक्रिया करून थेट नदीत पाईपलाईन आणि नाल्यांद्वारे सोडतो. सांतीनेज हा आणखी एक मोठा स्त्रोत आहे, जो शहरी कचरा नदीत वाहून नेतो. ताळगावच्या नागल्ली टेकड्यांमधून उगम पावणाऱ्या जवळपास तीन किलोमीटर लांबीच्या या खाडीचा प्रवाह एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा जवळील पुलापाशी म्हादई नदीत मिळतो. अनेक दशकांपासून ही खाडी दुर्लक्षित राहिली आहे आणि जलसंपदा विभागाने अलीकडेच तिच्या काही भागांमध्ये कॉंक्रिटने किनारे मजबूत केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT