Mandar Surlkar Case Dainik Gomantak
गोवा

Mandar Surlkar Murder Case: मंदार सुर्लकर खूनप्रकरण; अखेर 'त्या' दोघांचीही कारागृहातून सुटका

Mandar Surlkar Case Update: गोव्याला हादरवून सोडलेल्या बहुचर्चित मंदार सुर्लकर अपहरण व खूनप्रकरणातील चारपैकी तीन दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याला हादरवून सोडलेल्या बहुचर्चित मंदार सुर्लकर अपहरण व खूनप्रकरणातील चारपैकी तीन दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गोवा खंडपीठाने प्रशासकीय विलंबावरून सरकारला खडसावल्यानंतर रोहन धुंगट आणि शंकर तिवारी या दोघांचीही मंगळवारी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारागृहातून सुटका करण्यात आली. या प्रकरणावर बुधवारी (ता. १२) उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

सोमवारीच या प्रकरणातील तिसरा दोषी जोव्हिटा रायन पिंटो याची सुटका करण्यात आली होती. मंगळवारी उर्वरित दोघांचीही सुटका झाल्याने या प्रकरणातील तीन दोषी आता तुरुंगाबाहेर आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी तिन्ही दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, सोमवारी सकाळपर्यंत आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने दोषींच्या वकिलांनी हा मुद्दा पुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर खंडपीठाने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.

सरकार मात्र ठाम

उच्च न्यायालयाने दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा निर्णय दिला असला तरी राज्य सरकारने आपली भूमिका कायम ठेवली आहे. या निर्णयाला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT