woman's Murder
woman's Murder Dainik Gomantak
गोवा

दारूच्या नशेत महिलेची हत्या; एकाला 5 वर्षे सक्तमजुरी

दैनिक गोमन्तक

मडगाव : दारूच्या नशेत शांता बेल्लारी या 40 वर्षीय महिलेचा गळा दाबून हत्या करण्याचा आरोप असलेल्या सिदलिंगप्पा बिसनाल याला दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून 5 वर्षांच्या सक्तमजुरीच्या कैदेची शिक्षा ठोठावली. (Man sentenced to 5 years for killing woman )

या शिवाय संशयिताला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून हा दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त साधी कैद फर्मावण्यात आली आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून देवानंद कोरगावकर यांनी बाजू मांडली तर तपास अधिकारी म्हणून फातोर्डाचे तत्कालीन निरीक्षक नवलेश देसाई यांनी काम पाहिले. या प्रकरणात एकूण 16 साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली होते.

या प्रकरणी 17 ऑक्टोबर 2018 या दिवशी सकाळी पाजीफोंड मडगाव येथील एका घराच्या व्हरांड्यात एका महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून सिदलिंगप्पा या हमालाला अटक केली होती. ज्या दिवशी त्या महिलेचा मृतदेह आढळला त्याच्या आदल्या दिवशी संशयिताची त्या महिलेशी रेल्वे स्थानकावर गाठ पडली होती. ही मूळ कर्नाटक येथील महिला मानसिक तणावाखाली होती आणि घरात कुणाला न सांगता गोव्यात निघून आली होती.

सिदलिंगप्पा याने तिला रात्रीचा आसरा देण्याच्या बहाण्याने आपल्या बरोबर बोलविले. रात्री त्या दोघांनी दारू घेतली. त्याच अवस्थेत त्यांचे भांडण झाल्याने त्याने तिचा गळा आवळून खून केला. त्याच्यावर पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले होते. पण ही हत्या पूर्वनियोजित खुनाचा प्रकार हे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT