Cyber Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa: उच्च परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 19 लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगारांनी सांगोल्डा येथील व्यक्तीला उच्च परताव्याचे आमिष दाखवून फसवले.

दैनिक गोमन्तक

पणजी: सांगोल्डा येथील एका व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी जमा केलेल्या पैश्यांवर उच्च परतावा मिळवण्याचे आमिष दाखवून 19 लाखांचा गंडा घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराला ऑनलाइन (Online) पद्धतीने विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले. यासाठी त्यांनी आपण एका ट्रेडिंग फर्मचे कर्मचारी असल्याचे तक्रारदाराला पटवून दिले. (Cyber Crime Goa)

आरोपींनी मोबाईल मेसेजिंग अ‍ॅपद्वारे (App) तक्रारदाराशी संपर्क साधला होता, असे पोलिसांनी सांगितले. पुढे आरोपींनी त्याला उच्च परतावा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले.आरोपींच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने सांगितलेल्या बँक (Bank) खात्यांमध्ये पैसे जमा केले. तक्रारदाराने एकूण 19.24 लाख रुपये गुंतवले, असे पोलिस म्हणाले.

तक्रारदाराने ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला.
हे अ‍ॅप बनावट आहे, असे पोलिसांनी सांगितले, सायबर क्राईम पोलिस, रिबंदर यांनी एफआयआर नोंदविला आहे आणि तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT