Dead Body Dainik Gomantak
गोवा

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Man drowns in river Goa: केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुशील प्रभुदेसाई हे दर रविवारी आपल्या मूळ गावी जात असत.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: असोल्डा येथे कुशावती नदीत देवपूजेची फुले विसर्जन करण्यासाठी गेला असता पायऱ्यांवरून पाय घसरल्याने नदीत पडून एका ४६ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुशील प्रभुदेसाई असे त्यांचे नाव असून तो मूळ कोठंबी-केपे येथील आहे. बड्डे-मडगाव येथे ते राहत होते. काल रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली.

आज सोमवारी त्यांचा मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगताना आढळला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून केपे पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक अर्जुन सांगोल्डकर यांच्या मार्गदशनाखाली उपनिरीक्षक सोमेश प्रभुदेसाई पुढील तपास करत आहेत. भाजपच्या क्रियाशील कार्यकर्त्या कल्पिता प्रभुदेसाई यांचे सुशील हे पती होत.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कोठंबी येथे शोकाकूल वातावरणात मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील हे दर रविवारी आपल्या मूळ गावी जात असत.

पायऱ्यांवरून घसरल्याने ते पाण्यात पडले व बुडाले. रविवारी तेबेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास कामाला सुरवात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT