Goa train accident death Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: 'गडबड केली आणि जीव गमावला'! धावत्या रेल्वेतून उतरताना पडून अज्ञाताचा मृत्यू; करमळी स्टेशनवरील धक्कादायक घटना

Goa train accident death: धावत्या रेल्वेतून उतरण्याचे धाडस एकाच्या जीवावर बेतले. ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा तिथे मृत्यू झाला.

Sameer Panditrao

मडगाव: धावत्या रेल्वेतून उतरण्याचे धाडस एकाच्या जीवावर बेतले. ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा तिथे मृत्यू झाला. करमली येथे शुक्रवारी (ता.६) रोजी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. मृताची ओळख अजून पटू शकली नाही.

अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी ही घटना नोंदवलेली आहे. पोलिस निरीक्षक राहूल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुणाल वेर्लेकर हे पुढील तपास करीत आहेत.

ही व्यक्ती मंगला एक्सप्रेसमधून मडगावहून जनरल डब्यातून प्रवास करीत होती. करमली रेल्वे स्थानकजवळ रेल्वे पोहचताच त्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला मात तो खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला.

मागाहून रेल्वेच्या ट्रॅकमॅनने ही बाब रेल्वे स्थानकावरील पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले होते. शनिवारी त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडे कुठलीही ओळखपत्रे आढळली नसल्याने, त्याची ओळख पटवणे मुश्किल होऊन बसले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT