Nilkanth Halarnkar Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: मालीम-बेती मासेमारी जेटीवर १८०० चौरस मीटर जागेत अतिक्रमण

Nilkanth Halarnkar: अतिक्रमणे हटवून या जेटीचे उर्वरित बांधकाम हाती घेऊन तेथे स्वच्छतेला प्राधान्‍य दिले जाईल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, ता. ६ (प्रतिनिधी) : मालीम-बेती मासेमारी जेटीवरील मांडवी मच्छीमार सहकारी संस्थेच्या सदस्यांनीच सुमारे १८०० चौरस मीटर जागेत अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे ही जेटी ताब्यात घेऊन तेथे प्रशासकाची नेमणूक केली जाईल. तसेच अतिक्रमणे हटवून या जेटीचे उर्वरित बांधकाम हाती घेऊन तेथे स्वच्छतेला प्राधान्‍य दिले जाईल, असे आश्‍वासन मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले.

मालीम जेटीची स्थिती खराब झाली आहे. तेथे स्वच्छता नसल्याने तेथील परिसर गलिच्छ बनला आहे. या जेटीचे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ट्रॉलर्सधारकांना मासे अनलोडिंग करण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होतात. या जेटीचे काम केव्हा

पूर्ण होणार? तसेच तेथील अस्‍वच्‍छता कधी दूर करणार? अशी लक्षवेधी सूचना सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी मांडली होती.

मालीम जेटीवर सुमारे २७० ट्रॉलर्स आहेत. जेटीजवळील मांडवी नदीतील गाळ उपसा न झाल्याने अधिक ट्रॉलर्स तेथे उभे करता येत नाहीत. बारा वर्षांपूर्वी या जेटीचे नूतनीकरण करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते, मात्र अजून ते पूर्ण झालेले नाही.

या ठिकाणी २० ऐवजी ६ मासळी ट्रकच उभे करता येतात. पाण्याची सोय नसल्याने टँकरने पाणी आणावे लागते. बहुतांश ट्रॉलर्स हे रात्रीचे परतत असल्याने तेथे हायमास्ट दिव्याची सोय करावी, अशी मागणी बोरकर यांनी केली.

गेल्या वर्षी विधानसभेत दिलेल्या उत्तरात मालीम जेटीवर हायमास्ट दिवे चार महिन्यांत उभारण्यात येतील अशी ग्वाही देण्‍यात आली होती. पण ती पूर्ण झाली नाही. मासळी लिलावासाठी २०० चौरस मीटर जागा असणे आवश्‍यक आहे. सध्‍याची जागा फारच अपुरी आहे. त्‍यामुळे तेथे व्‍यवसाय करताना खूप समस्‍या निर्माण होतात. या जेटीचे दुरुस्‍ती काम कधीपर्यंत पूर्ण होऊन ती कार्यान्वित होईल? असा प्रश्‍न बोरकर यांनी केला.

जेटीवर आणि जेटीबाहेर थाटले अनधिकृत गाडे

मालीम मच्‍छीमार जेटीवर आणि तेथील बाहेरील जागेतही अतिक्रमणे उभी राहिली आहेत. अनेक गाडे बेकायदा उभारण्यात आले आहेत. पार्किंगसाठी असलेली जागाही सोडण्‍यात आलेली नाही. विशेष म्‍हणजे मांडवी मासेमारी सहकारी संस्थेकडून कोणतीच कारवाई केली जात नाही, याकडे आमदार नीलेश काब्राल यांनी लक्ष वेधले. तर, या जेटीच्या ठिकाणी किमान ५० पाण्याचे टँकर्स लागतात. तेथे पाणीसाठा करून ठेवण्याची सोय नसल्याने जमिनीखाली पाण्यासाठी टाकी बांधण्याची आवश्‍यकता आहे, असे आमदार केदार नाईक यांनी सांगितले.

मजुरांसाठी बांधून दिल्‍या बेकायदा खोल्‍या

मालीम जेटीवर मच्‍छीमार सहकारी संस्थेच्या काही सदस्यांनी त्यांच्या मजुरांना खोल्या काढून दिलेल्या आहेत. तेथील जेटीचे ५० टक्क्यांहून अधिक काम झालेले आहे व उर्वरित काम करायचे असल्यास ही अतिक्रमणे आधी हटवण्याची गरज आहे. लवकरच तेथे हायमास्ट दिवे तसेच शौचालये आदी सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातील, असे नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

मालीम जेटीवर ज्‍यांनी अतिक्रमण केलेले आहे, त्‍यात तेथील सहकारी संस्थेच्या सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे हटवण्यासाठी अगोदर या संस्थेवर प्रशासक नेमून ती ताब्यात घेण्याची गरज आहे. सदर जेटी ट्रॉलर्समधील मासे उतरवण्यासाठी तसेच मासळी ट्रकमध्ये चढवण्यासाठी आहे. मात्र, तेथे मासे कापणे व मासे विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
नीळकंठ हळर्णकर, मत्‍स्‍योद्योगमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: खडकावर बसला दारूच्‍या नशेत, अजस्त्र लाटांनी त्याला घेतले कवेत; मैत्रिणीच्‍या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नडले; बागा किनाऱ्यावरील घटना

Goa Electricity: वीज ग्राहकांना मिळणार दंडाचे 43 कोटी परत, पुढील बिलांतून वळते; वीज विभागाचा मोठा निर्णय

Horoscope: निर्जला एकादशीला शिवयोगाचा दुर्मिळ संयोग; कुंभ, मीनसह अनेक राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी, धनलाभाचे प्रबळ संकेत

Gold And Silver Crash: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने 1800 तर चांदी 7500 रुपयांनी स्वस्त VIDEO

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

SCROLL FOR NEXT