Court  Dainik Gomantak
गोवा

मारहाणप्रकरणी माल्कमचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पोलिसांनी तपासकाम प्राथमिक टप्प्यात असल्याचे तसेच काही पुरावे जमवायचे असल्याने अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी : रोहित महेश हिरेकुर्बार याला शिवीगाळ करण्याबरोबरच जबर मारहाण केल्याप्रकरणी सेंट लॉरेन्स -आगशी येथील माल्कम झेव्हियर पाल्हा (29 वर्षे) याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.

संशयिताची वृत्ती अहंकारी असून जीवे मारण्याची धमकी देण्यामागील कारण पोलिसांना जाणून घेण्यासाठी त्याची पोलिस कोठडी आवश्‍यक असल्याचे निरीक्षण नोंदवल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळताना आहे.

माल्कमने 4 एप्रिल 2022 रोजी रोहित हिरेकुर्बर याच्या घरी जाऊन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. यापूर्वीही संशयिताने रोहित सापडला नाही, म्हणून त्याच्या चुलतभावाला नाहक मारहाण केली होती.

मारहाण करताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे, त्यामध्ये महेंद्रनाथ रामनाथचंद्रा, शैलेश कुमार, बजरंग बिठा, आनंद महातो, दुर्गा महातो, शिवशंकर साहू, नरेंद्र कुमार व महेश हिरेकुर्बार यांचा समावेश आहे. संशयित घरी आला होता व त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे रोहितने जबानीत सांगितले आहे.

पोलिसांनी तपासकाम प्राथमिक टप्प्यात असल्याचे तसेच काही पुरावे जमवायचे असल्याने अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता. मारहाणीची चित्रफित रोहितचे वडील महेश हिरेकुर्बार यांनी पोलिसांना तसेच न्यायालयात सादर केली. त्यात संशयित माल्कम पाल्हा हा उर्मटपणे शिविगाळ करून मारहाण करत असल्याचे दिसत आहे. चित्रफित पाहिल्यानंतर संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यास ही माहिती पुरेशी आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT