Salaulim Dam Goa
Salaulim Dam Goa Dainik Gomantak
गोवा

Dams In Goa: उन्हाळा येतोय गोव्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठी शिल्लक, जाणून घ्या आकडेवारी

Pramod Yadav

राज्यात उष्णतेचा पारा चढू लागला आहे. असह्य उष्म्यामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. दरम्यान, येत्या काळात पार आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे असे गोवा हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, उष्णता वाढत असताना राज्यातील धरणातील पाणी साठ्याची स्थिती काय आहे. किती पाणीसाठी कोणत्या धरणात उपलब्ध आहे. याची आकडेवारी जाणून घेऊया.

राज्यात अंजुणे, साळावली, चापोली, आमठाणे, पंचवाडी आणि गावणे ही सहा प्रमुख धरणे आहेत. राज्यात पाऊस उत्तम झाल्याने सर्व धरणे 100 टक्के फुल्ल भरली होती. दरम्यान, पावसाळ्यानंतर सध्या राज्यातील या धरणांमध्ये 50 ते 70 टक्के या दरम्यान पाणीसाठा उपलब्ध आहे.

अंजुणे (56 टक्के), साळावली (73 टक्के), चापोली (72 टक्के), आमठाणे (69 टक्के), पंचवाडी (48 टक्के) आणि गावणे (65 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

साळावली धरण दक्षिण गोव्यातील लोकांची ताहण भागवणारे प्रमुख धरण आहे. या धरणाची उंची 41.1 मीटर एवढी असून, सध्या 37.8 मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच, काणकोण येथील चापोली धरणात 35.3 मीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

बार्देश, डिचोली आणि पेडणे तालुक्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करणारे आमठाणे धरणात सध्या 69 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, तिलारी धरणाचे कॅनालची तब्बल 22 वर्षानंतर दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात धरणांवर अतिरिक्त भार आला.

दरम्यान, गोव्यात जवळपास 300 वसंत बंधारे आहेत. नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यातील पाणी ज्यावेळी पाण्याची कमतरता असेल त्यावेळी वापरता येऊ शकते अशी सोय करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT