shivdutt naik goa Dainik Gomantak
गोवा

Mainapi Waterfall : पंधरा वर्षांपूर्वी पतीचे निधन, मैनापीत कर्ता मुलगा बुडाल्याने आजारी आई एकाकी

‘मैनापी’वर बुडालेल्‍या दुसऱ्या युवकाचाही मृतदेह आढळला

दैनिक गोमन्तक

Goa Mainapi waterfall : मैनापी धबधब्यावर रविवारी सहलीसाठी गेलेले दोघेजण बुडाले होते. त्‍यातील जनार्दन सडेकर यांचा मृतदेह कालच हाती लागला होता. तर, शिवदत्त नाईक (28) या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी साडेसातच्‍या सुमारास तेथेच तरंगताना आढळला.

या धबधब्‍यावर फोंडा एलआयसी कार्यालयातील एक तर वास्को येथून दुसरा गट आला होता. मूळ होडार- कुडचडे येथील पण सध्या वास्को येथे वास्तव्यास असलेला अभियंता शिवदत्त नाईक हा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच म्हापसा येथील जनार्दन सडेकर यांनी त्‍याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.

परंतु पाण्‍याचा अंदाज न आल्‍याने दोघेही बुडाले. दरम्‍यान, मयत शिवदत्त नाईक याच्यावर होडार-कुडचडे येथील स्मशानभूमीत संध्‍याकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.

वडिलांचाही दुर्घटनेतच झाला होता मृत्यू

शिवदत्त नाईक हा युवक मूळ होडर-कुडचडे येथील असला तरी कामानिमित्त तो वास्को येथे राहत होता. शिक्षणही तेथेच होऊन सिव्हिल अभियंता म्हणून खासगी आस्थापनात नोकरी करत होता.

त्याची घरची परिस्थिती हलाखीची असून आई दीर्घ आजाराचा सामना करीत आहे. महिनाभरापूर्वीच त्‍याच्‍या बहिणीचे लग्न झाले होते, तर वडिलांचा पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

पाय घसरून पडला!

मयत शिवदत्त नाईक हा आंघोळीसाठी पाण्यात उतरला नाही तर तो पाय घसरून पाण्यात पडला होता. त्याच्या डोक्‍याला जखम झाल्याचे मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर दिसून आले.

अंगावरील कपडे आणि पायातील बूट तसेच होते. यावरून शिवदत्त पाय घसरून पाण्यात पडल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT