goa police assault custody suspension Dainik Gomantak
गोवा

मारहाणप्रकरणी आणखी दोघा पोलिसांचे निलंबन, मायणा-कुडतरी प्रकरण; अधीक्षक, निरीक्षकांना नोटीस

Maina curtorim police suspension case: युवकांना ताब्‍यात घेऊन मारहाण करण्‍याच्‍या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांची सर्वत्र छी-थू होत असतानाच आणखी दोघांना निलंबित करण्‍यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: युवकांना ताब्‍यात घेऊन मारहाण करण्‍याच्‍या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांची सर्वत्र छी-थू होत असतानाच आणखी दोघांना निलंबित करण्‍यात आले. समीर सुदिर (हवालदार) आणि पुंडलिक परीट (शिपाई) अशी त्‍यांची नावे आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची गोवा राज्य मानवाधिकार आयोगाने स्वेच्छा दखल घेत दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक आणि मायणा-कुडतरी पोलिस निरीक्षक यांना १७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

दारूच्‍या नशेत आम्हाला नग्न करून बेदम मारहाण केली, अपमानास्पद वागणूक दिली, तंबाखू चघळून तोंडाचा वास घेण्यास भाग पाडले, मारहाणीचे मोबाईलवर चित्रीकरण केले, असे सनसनाटी आरोप मारहाण झालेल्‍या पीडित युवकांनी केले आहेत. ॲड. लिओना बार्रेटो यांनी पीडित युवकांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्‍यांनी वरील धक्कादायक आरोप केले. मारहाण करणाऱ्या पोलिसांनी फुटबॉल जर्सी परिधान केली होती, असेही त्‍यांनी सांगितले.

मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती भारत देशपांडे आणि सदस्य प्रमोद कामत यांनी हा आदेश जारी केला आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी त्‍यास दुजोरा दिला.

६ जूनच्‍या रात्री रामनगरी-नेसाय येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर चौघा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांना बेदम मारहाण करण्‍यात आली. या प्रकरणातील प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आल्याने पोलिस शिपाई चेतन कोळी याला यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस उपनिरीक्षक संकेत नाईक (ड्युटी अधिकारी), उपनिरीक्षक गौरव नाईक यांच्‍यावरही कडक कारवाई झाली पाहिजे तसेच या घटनेची चौकशी क्राईम ब्रँचकडे द्यावी, अशी मागणी ॲड. बार्रेटो यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गुरुवारचा दिवस ठरणार भाग्यवान! श्रीविष्णूंच्या विशेष कृपेने या 3 राशींना नोकरीत मोठे यश, धनलाभाचेही प्रबळ योग

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

SCROLL FOR NEXT