Goa Tourist Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Murder Case: हत्येप्रकरणी जप्त 'थार' 8 लाखांच्या हमीवर सुपूर्द, अतिरिक्त सत्र न्यायालयाचे आदेश; मारहाणीत पर्यटकाचा झाला होता मृत्यू

Goa Tourist Murder Case: उत्तर प्रदेशातील पर्यटकाच्या हत्येप्रकरणी जप्त करण्यात आलेली मुख्य संशयित गुरुदत्त लवंदे यांच्या मालकीची ‘महिंद्रा थार’ अखेर ८ लाख रुपयांच्या इंडेम्निटी बाँडवर परत करण्याचे आदेश मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: उत्तर प्रदेशातील पर्यटकाच्या हत्येप्रकरणी जप्त करण्यात आलेली मुख्य संशयित गुरुदत्त लवंदे यांच्या मालकीची ‘महिंद्रा थार’ अखेर ८ लाख रुपयांच्या इंडेम्निटी बाँडवर परत करण्याचे आदेश मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिले आहेत.

पर्यटकाने कांदोळी येथील व्यावसायिक गुरुदत्त लवंदे यांच्याकडून ही महिंद्रा थार भाड्याने घेतली होती. गाडीतील जीपीएस ट्रॅकरद्वारे थार महाराष्ट्राच्या हद्दीत गेल्याचे दिसताच लवंदे यांनी तिचा पाठलाग करून पर्यटकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला थिवी येथे आणून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पर्यटकाचा मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ही थार गाडी महत्त्वाचा दुवा ठरली होती.

अर्जात दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली महिंद्रा थार कांदोळी येथील रहिवासी गुरुदत्त लवंदे यांच्या मालकीची आहे. ही गाडी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ५०३ अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाद्वारे परत मागण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, गाडी पडून राहिल्यास ती खराब होईल, तसेच तिच्यावर कर्जाचे हप्ते प्रलंबित आहेत, असा युक्तिवाद अर्जदारातर्फे करण्यात आला.

न्यायालयाने अर्जदाराला ८ लाख रुपयांचा इंडेम्निटी बाँड सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनाच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल करता येणार नाही. खटल्याच्या सुनावणीवेळी किंवा पुढील तपासासाठी निर्देश दिल्यास वाहन न्यायालयात अथवा तपास अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागेल.

हे वाहन कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. तसेच, तपास अधिकाऱ्यांनी सर्व बाजूंनी वाहनाचे हाय-डेफिनिशन फोटो काढून योग्य कागदपत्रांसह जतन करून ठेवावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय युवकाने कांदोळी येथील कार रेंटल व्यावसायिक गुरुदत्त लवंदे यांच्याकडून महिंद्रा थार गाडी भाड्याने घेतली होती. गाडीला लावलेल्या जीपीएस ट्रॅकरद्वारे ही थार महाराष्ट्राच्या हद्दीत गेल्याचे गुरुदत्त यांच्या लक्षात आले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीचा पाठलाग करून तिचा शोध घेतला व पर्यटकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला थिवी येथे आणून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून मुख्य संशयित गुरुदत्त लवंदे यांच्यासह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना अटक केली होती.

दुसरी कारही सोडण्याचा आदेश

दरम्यान, याच प्रकरणात जप्त करण्यात आलेली दुसरी ‘किआ’ कार २० लाख रुपयांच्या बाँडवर आणि विमा पॉलिसीची प्रत सादर करण्याच्या अटीवर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT