Mahashivratri Festival Dainik Gomantak
गोवा

गौरीशंकर कला संस्कृती मंडळातर्फे महाशिवरात्री उत्सव

उत्सवाचे यजमानपद रिमा आणि नितीन मोचेमाडकर या दाम्पत्यांना देण्यात आले.

दैनिक गोमन्तक

वास्को: श्री गौरीशंकर कला सांस्कृतिक मंडळाची वार्षिक सभा संस्थेचे संस्थापक कै. जयवंत रा. हळर्णकर यांच्या निवासस्थानी नवेवाडे, वास्को येथे नुकतीच पार पडली. संस्थेतर्फे 29 वा महाशिवरात्री उत्सव मंगळवार दि.1 मार्च रोजी होणार असून उत्सवाचे यजमानपद रिमा व नितीन मोचेमाडकर या दाम्पत्याला देण्यात आले.

महाशिवरात्रीनिमित्त सकाळ पासून धार्मिक विधी. दुपारी वैभवी सेल्फ हेल्प ग्रुप नवेवाडे, वास्को या महिला कलाकारांतर्फे घुमट महाआरती होईल.

दुपारी 3 ते 5 वाजे पर्यंत महिलांसठी हळदीकुंकू व विविध रंगारंग कार्यक्रम. सायंकाळी 5 वाजल्या पासून श्री गजानन महिला भजनी मंडळ, मांगोरहिल व ॐ राष्ट्रोळी सेल्फ हेल्प ग्रूप, नवेवाडे या महिला कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम.

रात्री 7.30 वाजता सप्तसूर ह्या संगीत नृत्य-नाटक-कला व सांस्कृतिक संस्थेच्या बाल व महिला कलाकारांचा जय जय शिव शंकरा हा अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम व रात्री 9.30 वाजता स्थानिक जेष्ठ भजनी कलाकारांचे भजन होणार आहे. सभेच्या सुरुवातीला दिगंवत संस्थापक व माजी अध्यक्ष कै. जयवंत रा.हळर्णकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विजय हळर्णकर यांनी प्रास्ताविक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT