Rajendra Kerkar |Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: लोकप्रतिनिधींचे म्हादईबाबत अज्ञान त्यामुळेच...

म्हादईची लढाई जिंकण्यासाठी खासदार, आमदारांनी नेमका अभ्यास करायला हवा, असे परखड मत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी जाहीर सभेत व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादईची लढाई जिंकण्यासाठी खासदार, आमदारांनी नेमका अभ्यास करायला हवा. लोकप्रतिनिधींचे म्हादईबाबत अज्ञान आहे. त्यामुळेच संसदेत, दिल्‍लीदरबारी व इतर व्यासपीठाकडे नेमकी बाजू मांडली जात नाही.

या उलट कर्नाटकचे लोकप्रतिनिधी राज्याच्या हितासाठी बाजू मांडतात, ही परिस्थिती बदलण्यासाठी आपली पाण्याची गरज, आपल्या नद्या आणि नैसर्गिक जलस्रोत याबाबत माहिती घ्यायला हवी, असे परखड मत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी माशेल येथे ‘आमची म्हादय, आमकां जाय’तर्फे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले.

व्यासपीठावर कांता गावडे, नोनू नाईक, रामकृष्ण जल्मी, राजेंद्र काकोडकर, ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, रामकृष्ण जल्मी, प्रकाश नाईक उपस्थित होते.

याशिवाय उपस्थितांत विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार कार्लुस फेरेरा, आपच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो, दत्ताराम देसाई, तृणमूलचे समील वळवईकर, दिलीप बोरकर, रमेश गावस, फा. इरिक पेरेरा, मधू गावकरसह इतर अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित वक्ते व पर्यावरप्रेमींतर्फे म्हादईसाठी लोकलढ्याचा निर्धार करण्यात आला. ‘आमची म्हादई आमकां जाय’, ‘म्हादई महती गीत’ यावेळी सादर करण्यात आले. १६ रोजी साखळी येथे आयोजित म्हादईसाठीच्या महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश नाईक यांनी केले तर आभार नोनू नाईक यांनी मानले.

केरकर पुढे म्हणाले, म्हादईबरोबरच राज्यातील नद्यांचा अभ्यास हवा, आपल्या नद्या किती आहेत, याबाबतही आपल्याकडे अज्ञान आहे. एका अहवालात नऊ नद्यांची नोंद होती. पर्यावरणवाद्यांनी माहिती दिल्यानंतर 11 नद्यांची नोंद केली गेली. फक्त नदीला आई, माता, जीवनदायिनी म्हणून काहीही उपयोग नाही.

तिची काळजी घेतली पाहिजे. नद्यांच्या काठावरच आपली संस्कृती निर्माण झाली आहे. नदी काठावर अनेक पिढ्यांचे जीवन गेले आहे. पाणी हेच जीवन आहे, त्यामुळे म्हादईबरोबरच राज्यातील सर्व नद्यांचे अस्तित्व धोक्यात आहे.

तेव्हा या नद्यांची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक गोमंतकीयाने जलसंवर्धनासाठी जागृत झाले पाहिजे, शासनानेही डोळस कृती करणे गरजेचे आहे. नद्यांबाबत राजकारण उपयोगाचे नाही, सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे.

पर्यावरण अभ्यासक राजकारणात हवेत!

‘म्हादई’चा लढा लढण्यासाठी सक्षम राजकीय नेता हवा. त्यासाठी पर्यावरणाचा अभ्यास असणारा नेता विधानसभा, लोकसभेत हवा. पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकरांसारखे अभ्यासक राजकारणात यायला हवेत. ते गोव्याची पर्यावरणीय बाजू उत्तमप्रकारे निश्‍चित मांडतील. पर्यावरणीय असमतोलाकडे ते लक्ष देतील, असे मत ‘गोमन्तक’चे संपादक -संचालक राजू नायक यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, म्हादईसाठी लोकलढा व्हायला हवा. म्हादईचे पाणी कमी झाले, तर संपूर्ण गोव्यावर संकट कोसळणार आहे. या लढ्याला दक्षिण गोव्यातूनसुद्धा समर्थन आहे. सत्तरीतूनही या लढ्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. म्हादईसह इतर नद्या वाचविण्यासाठीसुद्धा लोकांनी पुढे आले पाहिजे.

गोवा सांभाळण्यासाठी, म्हादई वाचविणे गरजेचे आहे. कारण हा गोमंतकीयांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. कर्नाटकच्या मनमानीमुळे बेंगळूरसारख्या शहरातील मोठी तळी नष्ट झाली, बेसुमार बांधकामे वाढली.

त्यामुळे प्रत्येकवर्षी शहरातही पूरसदृशस्थिती निर्माण होते. कर्नाटकचे धोरण चुकीच्या पद्धतीचे आहे. राजकीयशक्तीचा वापर करून म्हादईचा गळ घोटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT