Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : सेव्ह गोवा’ने म्हादईच्या विषयावर कर्नाटकात सभा घ्यावी : मनोज परब

केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने म्हादईविषयी जनतेला फसविले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute : काँग्रेसचे नेते असलेले हृदयनाथ शिरोडकर आणि महेश म्हांबरे हे ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’चे नेतृत्व करतात. या संघटनेने म्हादईच्या विषयावर कर्नाटकात सभा घ्यावी, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कर्नाटक सरकारने कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी केलेल्या एक हजार कोटींच्या तरतुदीविषयी काँग्रेसची म्हादईबाबतची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्सचे (आरजी) नेते मनोज परब यांनी केली.

पक्षाच्या कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार विरेश बोरकर यांची उपस्थिती होती. परब म्हणाले, भाजप पराभूत झाल्याने म्हादई वळविण्याचा भाजपचा प्रयत्न संपला. परंतु कर्नाटक सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्प मांडला. त्यात मुख्यमंत्र्यांनी कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी एक हजार कोटींची तरतूद केली, त्याशिवाय त्यांनी आवश्‍यक त्या सर्व परवानग्या घेऊन काम सुरू करणार असल्याचे सांगितले. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीही हेच सांगितले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ या चळवळीत काँग्रेस सहभागी झाली असल्याने या पक्षाची म्हादईविषयीची भूमिका स्पष्टपणे जनतेला कळायला हवी, असेही परब यांनी म्हटले.

जनतेची फसवणूक

आमदार बोरकर म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने म्हादईविषयी जनतेला फसविले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या एक हजार कोटींच्या तरतुदीनंतर खरेतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भूमिका मांडायला हवी होती. आता त्यांनी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांची भेट घेऊन केलेली तरतूद मागे घेण्यास सांगावे, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT