Books on Mahadayi River
Books on Mahadayi River  Gomantak Digital
गोवा

Mahadayi River Dispute: म्हादई नदीवरील ही पाच पुस्तकं वाचली का?

गोमन्तक वृत्तसेवा

आसावरी कुलकर्णी

म्हादई नदीवरुन गोवा आणि कर्नाटकमध्ये संघर्ष पेटलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकचे सर्वच राजकीय पक्ष या नदीच्या मागे हात धुवून लागले आहेत.

दुसरीकडे गोव्यात याच मुद्द्यावरून होळी आधीच शिमगा सुरू झालाय. काय आहे नेमका हा विषय? म्हादईचे अस्तित्व का गरजेचे आहे गोव्यसाठी? इथली लोकसंस्कृती काय आहे? हे सगळे मुद्दे गेली वीस वर्ष कुठल्या न कुठल्या माध्यमातून समोर आले आहेत.

गोव्यातील या महत्त्वाच्या विषयावर अजून पुस्तक आहेत का? त्यांचे लेखक कोण आहेत या विषयी आपण माहिती घेऊ...

Mahadayi River

१. म्हादयी काळजातल्यानं कागदार

एखाद्या नदीवरचा जगातला पहिला माहितिकोश असे कौतूक झालेले हे पुस्तक. म्हादई नदीचा मुद्दा जेव्हापासून चर्चेत आला तेव्हापासून डॉ प्रकाश पर्येंकर हे यासाठी काम करतायतं. पण जनजागृती करताना त्यांना अस लक्षात आलं की एकूणच प्रश्नावर लिखित स्वरूपात माहिती कमी आहे.

याच कारणामुळे त्यांनी म्हादईच्या उगमापासून ते संगमापर्यंत परिक्रमा केली. याच परिक्रमेतून आणि त्यांच्या वैयक्तिक संशोधनातून नदीवरचा संपूर्ण महितिकोश तयार झाला. या पुस्तकाचे नावही तसंच समर्पक आहे.

म्हादई काळजातल्यानं कागदार… असं या पुस्तकाचं नाव. प्रसिद्ध संशोधक डॉ नंदकुमार कामत यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याचे अर्थसहाय्य या पुस्तकाला मिळलेलं आहे.

पुस्तकाची किंमत

१,२०० रुपये.

पुस्तकात नेमकं काय?

इतिहास, लोकसंस्कृती, लोकजीवन, देवळे, इतकेच नाही तर अगदी इथल्या दगडावरही लेखकाने लिहिलं आहे. म्हादई नदीची संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर हे पुस्तक संग्रही असायलाच हव.

Goan Literature

Mhadei: Kallzantlyan Kagdar

2. अंतरंग म्हादईचे :

शुभदा चारी यांनी लिहिलेले हे मराठी भाषेतले पुस्तक. राजेंद्र केरकरांसोबत केलेल्या अथक संशोधनातून तयार झालेलं हे पुस्तक.

खुद्द गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः या पुस्तकाचे विधानसभेत कौतुक केले तसेच या पुस्तकाचे इतर भाषेत अनुवाद करून म्हादईचा विषय अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 

गोवा मराठी अकादमीचे अर्थसहाय्य मिकलेले हे पुस्तक. अत्यंत कमी वयात लेखिकेने एका महत्त्वाच्या विषयावर लिहिलेले हे पुस्तक कौतुकास्पद आहे

पुस्तकाची किंमत: 600 रुपये

Shubhada Chari

3. म्हादई:

प्रसिद्ध पर्यावरण लेखक मोहन पै हे ब्लॉगच्या माध्यमातून पर्यवरणाच्या मुद्द्यावर लिहीत असतात. म्हादईच्या महत्वाच्या विषयावर त्यांनी स्वतः भ्रमंती करून इंग्रजी भाषेत म्हादईच्या काठावरच्या लोकजीवनावर आणि एकूणच उगमापासून समुद्रापर्यतचा प्रवास टिपला आहे.

चार भागात असलेला हा ब्लॉग त्यांनी पुस्तकरूपानेही प्रकाशित केलेला आहे. इंग्रजी आणि कोकणी अशा  दोन्ही भाषेमध्ये ही पुस्तक आहेत.

4. म्हादई विशेषांक

म्हादई बचाव आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरू होण्या आधी या नदीशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी या विषयी जागृती सुरू केली होती.

अश्याच तज्ञ लेखकांचे लेख म्हादयी नावाच्या विशेषांकाच्या रूपाने प्रकाशित केला गेला. 1995 साली प्रकाशित झालेल्या या विशेषाकाचे संपादन लेखक श्री झिलू गावकर यांनी केले होते. काही वाचनालयामध्ये याच्या प्रति आजही उपलब्ध आहेत.

Mhadei

५. म्हादई बचाव अभियान

पश्चिम घाट संवर्धन समिती, निर्मल विश्व फोडा आणि म्हादई बचाव अभियान यांच्या  संयुक्त विद्यमाने 1999 साली केरी येथे म्हादयी या विषयावर झालेल्या कार्यशाळेत म्हादई या अंकाचे संकलन करण्यात आले होते.

म्हादईच्या विषयावर लोकसंस्कृती, औषधी झाडे , वनसंपदा इत्यादी विषयावर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी लेख लिहिले आहेत.  काही वाचनालयामध्ये हे अंक उपलब्ध आहेत.

म्हादई तंटा लवादाकडे हा वाद गेल्यानंतर नेमके काय काय मांडण्यात आले, पक्षकारांनी आपली भूमिका कशी मांडली या संदर्भात प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ नंद कुमार कामत यांनी 6000 पानांचा संदर्भ ग्रंथ तयार केला आहे, जो पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT