Madkai  Dainik Gomantak
गोवा

Madkai News : मडकई मतदारसंघ करणार चकाचक! सुदिन ढवळीकर

Madkai News :कवळेत रस्‍ता हॉटमिक्स डांबरीकरण सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Madkai News : फोंडा, मडकई मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लागली असून इतर कामांमुळे अडचणीत आलेले हॉटमिक्स डांबरीकरण सुरू करण्‍यात आले आहे.

येत्या १५ मेपर्यंत संपूर्ण मडकई मतदारसंघातील रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येतील, अशी ग्वाही या भागाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

कवळेतील आंबेगोळ तसेच इतर भागातील रस्‍ता हॉटमिक्स डांबरीकरणाला रविवारी प्रारंभ केल्‍यानंतर ढवळीकर बोलत होते. यावेळी कवळे पंचायत मंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम, वीज खात्याचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

मडकई मतदारसंघातील एलटी आणि एसटी वीजवाहिन्यांचे काम पूर्ण होत आले असून आता वीजजोडणीही दिली जात आहे. त्‍यामुळे मडकई मतदारसंघ विजेच्‍या बाबतीत आत्मनिर्भर बनेल. कपिलेश्‍वरी-कवळे येथील नियोजित वीजउपकेंद्राचे काम येत्या सप्टेंबरनंतर सुरू करण्यात येणार आहे.

त्‍यामुळे मतदारसंघातील अर्ध्या भागाचे वीजनियोजन केले जाईल, असे ढवळीकर यांनी सांगितले. वीज कनेक्शन घेताना अडचण येत असेल तर या खात्याचे अधिकारी, स्थानिक पंचायत किंवा आपल्‍याशी संपर्क साधा, असे आवाहनही त्‍यांनी केले.

कनिष्ठ अभियंत्याचा असाही ‘प्रताप’

कवळेतील एका वसाहतीत पाणीपुरवठा अनियमित असून पाच दिवस या लोकांना त्रास सोसावे लागले. एका कनिष्ठ अभियंत्याच्या प्रतापामुळे हा प्रकार घडला. हा अभियंता पाण्याचा व्‍हॉल्व बंद करत असल्याने लोकांना पाणी मिळत नव्हते.

यासंबंधीची चौकशी करण्यात आली असून वरिष्ठ अभियंत्यांकडे तक्रार देण्यात आली आहे. चांगल्या कामाचे कौतुक हे नेहमीच होत असते, पण वाईट काम करून लोकांना अडचणीत आणणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT