MP Women Found Dead In Goa Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: मुंबईतून गोव्यात आली, सकाळी हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; खूनाचा संशय

MP Goa Crime News: अहवालानंतर महिलेचा मृत्यू कसा झाला याबाबत माहिती समोर येईल.

Pramod Yadav

म्हापसा: मध्यप्रदेशातील खंडवा येथील ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह गोव्यातील कळंगुट येथील राजहंस हॉटेलमध्ये आढळला आहे. या घटनेत गोवा पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला असून, त्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन मास्क घातलेले तरुण, तरुणी कैद झाले आहेत. महिलेकडून पैसे लुटण्याच्या उद्देशाने दोघे खोलीत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भावना चौहान (३५, रा. रामनगर, खंडवा, मध्यप्रदेश) असे या मृत महिलेचे नाव आहे. मध्य प्रदेशातील कोतवाली पोलिसांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मृत भावनाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असून, अद्याप अहवाल समोर आलेला नाही. अहवालानंतर महिलेचा मृत्यू कसा झाला याबाबत माहिती समोर येईल. भावनाचा भाऊ अवधेश गोव्यात दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.

भावना यांच्या पश्चात त्यांचा ७ वर्षांचा मुलगा, आई-वडील, भाऊ अवधेश आणि वहिनी असा परिवार आहे. भावना वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत काम करत होती. भावनांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. इंटास फार्मास्युटिकल्स या वैद्यकीय कंपनीत ती गेली ५ वर्षे काम करत होती.

कार्यालयीन कामानिमित्त ती वारंवार मुंबईला जात असे. ७ मार्चला ती मुंबईला जाण्यासाठी घरून निघाली. १० तारखेला तिने कंपनीच्या टूरवर गोव्याला जात असल्याचे सांगितले. भावना गोव्यात आल्यानंतर कळंगुट येथील राजहंस हॉटेलमध्ये थांबली होती.

१५ मार्च रात्रीपासून संपर्क न झाल्याने भावनाच्या घरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. दरम्यान, गोव्यातील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शवविच्छेदन करुन मृतदेह भावनाच्या नातेवाईकांच्या हावाली केला आहे.

भावनाचे २०१५ मध्ये रतलाममधील रहिवासी आणि रेल्वे कर्मचारी रवींद्र सिंह तोमरसोबत लग्न झाले होते. सासरला होणाऱ्या छळाला कंटाळून मुलाला घेऊन भावना तिच्या मूळ गावी परतली. २०१७ पासून ती येथे राहत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT