Madgoan liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Madgoan liquor Seized :मडगावात २० दिवसांत ३ कोटींची दारू जप्‍त

Madgoan liquor Seized : उपलब्‍ध माहितीनुसार, पर्यटन केंद्र असलेल्‍या बार्देश तालुक्‍यात सर्वात जास्‍त प्रकरणांची नोंद झाली असून त्‍यानंतर पेडणेचा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमाकावर सासष्‍टी असल्‍याची माहिती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Madgoan liquor Seized :

मडगाव, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या २० दिवसांत अबकारी खात्याने ३.०५ कोटींची अवैध दारू पकडली आहे. एकूण १२६ जणांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत.

उपलब्‍ध माहितीनुसार, पर्यटन केंद्र असलेल्‍या बार्देश तालुक्‍यात सर्वात जास्‍त प्रकरणांची नोंद झाली असून त्‍यानंतर पेडणेचा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमाकावर सासष्‍टी असल्‍याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत जी दारू जप्‍त करण्‍यात आली आहे, त्‍यातील ३९,५९९.९२० बल्‍क लिटर दारू उत्तर गोव्‍यात पकडली आहे. १२४५९.८३९ बल्‍क लिटर दारू दक्षिण गोव्‍यात पकडली आहे.

पत्रादेवी चेक नाक्‍यावर ४२.६३ लाखांची दारू पकडली आहे. सासष्‍टी तालुक्‍यात दांडेवाडी-चिंचोणे येथे अबकारी खात्‍याने धाड घालून १२.९ लाखांची दारू पकडली. कुर्टी-फोंडा येथे एका पार्क केलेल्‍या ट्रकांमध्ये १७.१६ लाखांची दारू आढळली.

इस्‍टर संडेच्‍या दिवशी पत्रादेवी नाक्‍यावर भरारी पथकाला एका वाहनात ३० लाखांची दारू व वाहन चालकाकडे ५.३ लाखांची रोख सापडली होती. मुख्‍य निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्‍या माहितीनुसार १ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत गोव्‍यात वेगवेगळ्‍या ठिकाणी २.४४ कोटींची दारू पकडण्‍यात आल्‍याचे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT