Madgaon Urban Bank Dainik Gomantak
गोवा

Madgaum Urban Bank : मडगाव अर्बन बॅंक शाखांच्या जागेची विक्री

मडगाव अर्बन बॅंक खातेधारकांना त्यांच्या ठेवींची रक्कम परत करण्यास असमर्थ आहे.

दैनिक गोमन्तक

Madgaum Urban Bank : बंद करण्यात आलेल्या मडगाव अर्बन बॅंक को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या खातेधारकांना त्यांच्या ठेवींची रक्कम परत करण्यास असमर्थ आहे. त्यामुळे सरकारने नियुक्त केलेल्या लिक्विडेटर एस. व्ही. नाईक यांनी मडगाव, पणजी व बाणावली येथील बॅंकेच्या मालकीच्या शाखांच्या जागा विक्रीस काढल्या आहेत. त्या दृष्टीने विक्री प्रक्रिया सुरू झाली आहे.

लिक्विडेटरचे प्रतिनिधी अधिकारी, बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक किशोर आमोणकर यांनी या शाखांच्या जागा विकत घेऊ इच्छुक पाहणाऱ्यांना बोली प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बॅंकेने यापूर्वीच 58 कामगारांना नोकरीतून मुक्त केले आहे.

बॅंकेच्या मडगाव, जुना बाजार-मडगाव, बाणावली, पणजी, कुडतरी, गोवा वेल्हा व फोंडा अशा सात शाखा आहेत. बॅंकेच्या निविदा फॉर्म उपलब्ध आहेत व बोली प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांना अर्ज करण्याची तारीख 8 सप्‍टेंबर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोठे आहेत जागा?

पणजी : आझाद मैदानासमोरील नावेलकर ट्रेड सेंटर इमारतीचा पहिला मजला

मडगाव : लोहिया मैदानावर जवळील रिलायन्स प्लाझा इमारतीचा तळमजला

बाणावली : सेंट एण्ड्र्यूस चर्चच्या समोरील इमारतीमध्ये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT