Madgaon Municipal Council Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेवर राजकीय घडामोडींचे सावट!

आघाडीतील समझोत्यानुसार, फॉरवर्डच्या लिंडन परैरा यांचा पंधरा महिन्यांचा कार्यकाळ ऑगस्ट अखेरीस संपतो. त्यानंतर ते पद कामत गटाकडे येणार होते. पण, दरम्यानच्या घडामोडींमुळे वांदा झाला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : सध्याच्या दिवसांतील राजकीय घडामोडींचे, विशेषतः आमदार दिगंबर कामत यांनी काँग्रेसकडे राखलेल्या अंतरामुळे त्याचे सावट मडगाव नगरपालिकेतील काँग्रेस गोवा फॉरवर्ड आघाडीवर पडलेले आहे. ही आघाडी टिकते की, त्यातून एखादी नवीच आघाडी साकारते ते कामत यांच्या पुढील कृतीवर अवलंबून रहाणार आहे.

सध्या पंचवीस सदस्यीय नगरपालिकेत गोवा फॉरवर्ड व भाजपचे प्रत्येकी आठ तर काँग्रेसचे सात व दोन अपक्ष आहेत. आघाडीतील समझोत्यानुसार, फॉरवर्डच्या लिंडन परैरा यांचा पंधरा महिन्यांचा कार्यकाळ ऑगस्ट अखेरीस संपतो. त्यानंतर ते पद कामत गटाकडे येणार होते. पण, दरम्यानच्या घडामोडींमुळे वांदा झाला आहे.

कारण कामत यांनी भाजपशी संधान जुळविल्याने आमदार सरदेसाई पालिकेतील आघाडी पुढे चालू ठेवतात की काय हा जसा मुद्दा आहे त्याचप्रमाणे त्यांचे सर्व नगरसेवक भाजपकडील गटबंधनासाठी राजी होतात की नाही हा मुद्दाही रहातो. तीच गोष्ट भाजपसमर्थक नगरसेवकांचीही आहे. ते काँग्रेस नगरसेवकाबरोबर राहणार की काय हा मुद्दाही रहातो.

कामत यांच्यावर अवलंबून तिसरा गट

एका तिसऱ्या मुद्द्याची शक्यताही नाकारता येत नाही व ती म्हणजे हा जंजाळ नको मानणारे नगरसेवक एकत्र येऊन तिसराच गट माजी नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार होण्याची. दिगंबर कामत यांच्या पवित्र्यावर ते सारे अवलंबून असेल, असे राजकीय विश्लेषक मानतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT