Politics in Madgaon Municipality Dainik Gomantak
गोवा

Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्‍यक्ष निवड खुल्‍या पद्धतीने होणार!

पालिका प्रशासनाने काढलेल्‍या वटहुकुमाला राज्‍यपाल पी. एस. श्रीधरन पिल्‍लई यांनी गुरुवारी रात्री उशिरा मंजुरी दिली. त्‍यानंतर कायदा खात्‍याने त्‍याची अधिसूचनाही जारी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon Mayor Election : राज्‍यातील पालिकांमध्‍ये यापुढे नगराध्‍यक्ष, उपनगराध्‍यक्ष निवड ही खुल्‍या पद्धतीनेही (हात उंचावून) होऊ शकणार आहे. त्‍या संदर्भात पालिका प्रशासनाने काढलेल्‍या वटहुकुमाला राज्‍यपाल पी. एस. श्रीधरन पिल्‍लई यांनी गुरुवारी रात्री उशिरा मंजुरी दिली. त्‍यानंतर कायदा खात्‍याने त्‍याची अधिसूचनाही जारी केली आहे. परिणामी मडगाव पालिका नगराध्‍यक्ष निवड ही खुल्‍या पद्धतीने होण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही निवडणूक बुधवार, 12 ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहितीही खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून मडगाव पालिका नगराध्‍यक्ष निवड हा चर्चेचा विषय बनला होता. सरकारने ही निवड खुल्या पद्धतीने हात उंचावून घेता यावी, यासाठी कायद्यात दुरुस्ती करत वटहुकुमाची प्रक्रिया सुरू केली होती. त्‍यावर राज्‍यपालांकडून अखेर शिक्‍कामोर्तब झाले आहे. दरम्‍यान, नगरपालिका संचालक गुरुदास पिळर्णकर हे शुक्रवारी नगराध्‍यक्ष, उपनगराध्‍यक्ष निवड प्रक्रियेसाठी नोटीस जारी करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी वित्त खात्याचे संयुक्त सचिव विकास गावणेकर यांची पुन्हा निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.

आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये येऊनही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांची नाचक्की झाली होती. त्यामुळे ही निवडणूक आता सत्ताधारी भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. पालिका कायद्याच्या नियम 7 मध्ये दुरुस्ती करून त्याचा वटहुकूम काढण्यासाठी हल्लीच सरकारने मंत्रिमंडळातील मंत्र्यांना त्याचा मसुदा पाठवून मंजुरीसाठी सह्या घेतल्या होत्‍या.

मडगाव पालिकेत भाजपकडे 15 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना आपला उमेदवार जिंकून येणार, याची अजूनही खात्री नाही. अशातच कामत गटाचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार दामोदर शिरोडकर यांना पाठिंबा देण्यास भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. यासाठीच आता पक्षाचा बडगा दाखवून हात दाखवून खुलेपणाने त्यांच्याकडून मतदान करून घेणे, हा एकमात्र उपाय सरकारकडे उरला होता. त्यासाठीच सरकारने खटाटोप करून कायद्यात बदल करणारा वटहुकूम जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT