Goa Mining : खनिज निधी विकासासाठी नकोच; त्यावर केवळ खाणग्रस्त लोकांचा हक्क

खनिज पट्ट्यातील खाणग्रस्तांसाठी राखीव ठेवलेल्या जिल्हा खनिज निधीपैकी 50 टक्के निधी इतर विकासकामांना वापरण्यासाठी संमती मिळाली आहे.
Goa Mining Case
Goa Mining CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mining : खनिज पट्ट्यातील खाणग्रस्तांसाठी राखीव ठेवलेल्या जिल्हा खनिज निधीपैकी 50 टक्के निधी इतर विकासकामांना वापरण्यासाठी संमती मिळाली आहे. मात्र, या पैशावर केवळ खाणपट्ट्यातील खाणग्रस्तांचा हक्क आहे. त्यामुळे इतर विकासकामांसाठी हे पैसे वापरणे चुकीचे आहे, असे मत गोवा फाउंडेशनचे क्लॉड आल्वारिस यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात खनिज व्यवसाय सुरू असताना रॉयल्टीमधून मिळालेला विशेष निधी खाणपट्ट्याच्या विकासासाठी ‘कायम’ आणि ‘जिल्हा खनिज निधी’ म्हणून ठेवला जातो. हा राखीव खनिज निधी खनिजग्रस्तांसाठीच वापरणे अपरिहार्य आहे.

मात्र, यापैकी 50 टक्के निधी म्हणजे 123 कोटी रुपये राज्यातील विकासकामांसाठी वापरावा, यासाठी जिल्हा खनिज फाउंडेशन ट्रस्टने सहमती दिली आहे. मात्र, याला डॉ. अल्वारिस यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून खाणी बंद आहेत. त्यामुळे या पट्ट्यातील स्थानिक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असतानाही सरकार त्यांच्यासाठी हा निधी खर्च करत नाही. किंवा त्यांच्या विकासासाठी वापरत नाही. हा निधी खर्च करण्यासाठीच असतो. पण तो केवळ खाणग्रस्तांसाठीच असतो.  त्यांच्यासाठीच तो वापरणे अपरिहार्य आहे. आता यातील 50 टक्के निधी इतर विकास कामांसाठी वापरला जाणार, हे चुकीचे आहे.

 उत्तर गोवा जिल्हा खनिज फंड ट्रस्टकडे 136.2 कोटी आणि दक्षिण गोवा जिल्हा खनिज फंड ट्रस्टकडे 111.5 कोटी रुपये आहेत. यापैकी 50 टक्के निधी मुदत ठेवीमध्ये ठेवला जातो. उर्वरित 50 टक्के निधी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण उपाय, आरोग्य सेवा, शिक्षण, बालकल्याण यासारख्या प्रकल्पांसाठी खर्च करण्याकरिता उपलब्ध आहे.

Goa Mining Case
Vijai Sardesai : मडगाव नगराध्यक्षपदासाठी सरकारकडून रडीचा डाव

सरकारला न्यायालयात खेचायला हवे

हा निधी केवळ खनिजबाधित लोकांसाठी असतो. तो निधी लोककल्याण, कौशल्य विकास, स्वच्छता, सिंचन प्रकल्प, ऊर्जा, पाणलोट विकास यासाठी वापरला जातो. तो इतर लोकांसाठी नसतो. त्यामुळे सरकार ज्या पद्धतीने या निधीचा वापर करत आहे, ते पाहता त्यांना न्यायालयात खेचले पाहिजे, असेही डॉ. क्लॉड आल्वारिस म्हणाले.

राज्यात 63 कामांना मंजुरी, 36 पूर्ण

जिल्हा खनिज निधी ट्रस्टमधून उत्तर गोव्यात 41 कामांना मंजुरी दिली असून त्यापैकी 21 कामे पूर्ण झाली, तर 20 कामे सुरू आहेत. याकरिता 66.4 कोटी रुपये खर्च केले आहेत. दक्षिण गोव्यात 22 कामांना मंजुरी दिली असून त्यापैकी 15 कामे पूर्ण झाली आहेत. सात कामे सुरू आहेत. यासाठी 54.3 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com