Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'अधिकारी आहे', गोव्यात सरकारी रेस्ट हाऊसमध्ये फुकटात घेतला पाहुणचार, दोन पुणेकरांना अटक

Fake officers: अधिकारी असल्याचे भासवून सरकारी रेस्टहाऊस मध्ये पाहुणचार घेण्याचा प्रयत्न दोघांना अंगलट आलं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pune Tourist Arrested In Goa

मडगाव : अधिकारी असल्याचे भासवून सरकारी रेस्टहाऊस मध्ये पाहुणचार घेण्याचा प्रयत्न  दोघांना अंगलट आलं आहे. तेथील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या भामट्यांचा डाव फसला व शेवटी त्यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामराजे शिंदे  (३३) व दीपक शंकर गायकवाड (२९) अशी संशयितांची नावे असून  ते दोघेही मूळ पुण्यातील कात्रज येथील रहिवाशी आहेत. रविवारी ही घटना घडली.

मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या  जीवन हेल्प कौन्सिलचे अधिकारी असल्याचे त्या दोघांनी या रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. दीपक हा रूमचे बुकिंग करण्यासाठी आला होता, तर रामराजे हा त्याच्या समवेत होता.

दोघांच्या वागण्यावरून रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांच्याकडील ओळखपत्राची तपासणी असता ती बनावट असल्याचे आढळून आले आपले पितळ उघड पडल्याचे पाहून ते दोघेही  भांबावले. त्यांच्याकडे कुठलीही कायदेशीर कागदपत्रे  नव्हती.  

नंतर यासंबंधी फातोर्डा पोलिसांना  कळविल्यानंतर पोलिसांनी  घटनस्थळी  जाऊन, त्यांना ताब्यात घेतले.  नंतर ३१९ (२) कलमान्वये पोलिसांनी त्यांना अटक केली. एक रात्र पोलिस कोठडीत घालवल्यानंतर त्यांना सोमवारी सायंकाळी जामिनावर सोडण्यात आले. पोलिस निरीक्षक नाथॉन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलिस तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT