Goa Crime Canva
गोवा

Madgaon Crime: मडगावात अल्पवयीन मुलाला तिघांकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Assault on Minor in Goa: एका अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतलं आहे

Akshata Chhatre

मडगाव: एका अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी या घटनेची तक्रार नोंदवल्यांनंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनंतर मडगाव पोलिसांनी यामध्ये सामील तीन अल्पवयीन मुलांची अपना घरात रवानगी केली आहे.

तिघा आरोपींनी एकत्र येत अल्पवयीन मुलांच्या साहाय्याने पीडित मुलाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्याला धमक्या देखील देण्यात आल्या होत्या.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरवून अल्पवयीन मुलाची बदनामी केल्याचा आरोपही आरोपींवर करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पोलीस या घटनेचा घटनेमागील हेतू तपासत असून याबद्दल आणखीन पुरावे शोधले जात आहेत .

युवतीला पाठवले अश्लील मेसेज

उसगाव ग्रामपंचायतीचे सचिव होनाजी अनिल मोरजकर (वय ५५ वर्षे) याच्याविरुद्ध एका युवतीने विनयभंगाची तक्रार फोंडा पोलिसांत आज (मंगळवारी) दाखल केली. सत्तरी भागातील ही युवती सर्व्हेअर म्हणून कंत्राटी तत्त्वावर उसगाव पंचायतीत कामाला होती.

मात्र, कामाच्या निमित्ताने सचिवाने विनयभंग केल्याची तक्रार या युवतीने केली आहे. उसगाव - गांजेच्या पंचसदस्य मनीषा उसगावकर यांच्या सहकार्याने पीडित युवतीने ही तक्रार दाखल केली असून त्यात पंचायत सचिवाने या युवतीच्या मोबाईलवर पाठविलेले मेसेजही जोडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT