Azad Nagari murder case Dainik Gomantak
गोवा

आझाद नगरी खुनी आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ

डस्टरने केलेल्या हल्ल्यात एकाचा झाला होता मृत्यू

दैनिक गोमन्तक

मडगाव: वाढदिवसाच्या पार्टीला बोलविले नाही म्हणून येथील आझाद नगरीत राहणाऱ्या मुक्तार बदानी या 25 वर्षीय युवकाचा पाच जणांच्या टोळीने हल्ला करून खून केला होता. या प्रकरणी अटक केलेल्या विनोद जलगरे, सुरेश जलगरे, अक्षय भोवे, आसिफ नागरची व महंमद हुसेन शेख यांना आज मडगाव प्रथम वर्ग न्यायालयात रिमांडसाठी हजर केले असता त्यांची अधिक चौकशी करायला हवी अशी मागणी पोलिसांनी केल्यानंतर न्या. अंकिता नागवेकर यांनी त्यांच्या पोलीस कोठडीचा रिमांड सात दिवसांनी वाढवून दिला. ( Madgaon azad nagari murder case 5 arrested and increase in police custody of accused )

मडगाव येथील आझाद नगरीत 14 जुलै रोजी रात्री झालेल्या किरकोळ वादातून एका गुंडांच्या टोळीने हल्ला करत मुक्तार बदानी या 25 वर्षीय युवकाचा खून झाला होता. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले होते. तसेच या हल्ल्यात आणखी एक गंभीर जखमीवर इस्पितळात उपचार चालू आहेत.

काय झाला होता नेमका प्रकार ?

13 जुलै रोजी मुक्तार बदानी या युवकाचा वाढदिवस होता. त्यासाठी मुक्तारने केक कापण्याच्या कार्यक्रम ठेवला होता. या परिसरात सुरेश गँग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गँगचे युवक तिथे आले. त्यांनी कसला तरी वाद उरकून काढत नंतर हल्ला केला अशी माहिती स्थानिकांनी दिली. सुरेश गँगने यापूर्वीही या वस्तीत अशा प्रकारचे प्रकार केले आहेत. त्यामूळे स्थानिक नागरिकांना या प्रकरणांचा उबग आला आहे. पोलीसांना कळवल्यानंतर ही नाईलाज होत असल्याने नागरिकांना या समस्येवर मार्ग कसा काढावा याचे उत्तर मिळत नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT