Mad became eco friendly Dainik Gomantak
गोवा

माड-बाणसाय बनले ‘पर्यावरण स्नेही’

पुरस्काराचे वितरण: निवडणूक आयोगातर्फे प्रभागांची स्पर्धा

दैनिक गोमन्तक

मडगाव: मतदारांमध्ये पर्यावरण जतनाविषयी जागृती व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक मतदानावेळी ‘पर्यावरण स्नेही’ प्रभाग स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेचा पुरस्कार कुडचडे मतदारसंघातील 21 क्रमांकाच्या माड-बाणसाय प्रभागाला प्राप्त झाला आहे.

केपे येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांच्या हस्ते प्रभागस्तरीय अधिकारी अनिल सावंत देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी केपेच्या संयुक्त मामलेदार व कुडचडे मतदारसंघाच्या सहनिर्वाचन अधिकारी आवेलीना परेरा आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.

नैसर्गिक वस्तूंचा वापर:

हे पर्यावरण स्नेही प्रभाग पूर्णतः नैसर्गिक वस्तू वापरून तयार करण्यात आले होते. ज्यात अन्य कुठल्याही अनैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे तिथे मतदान करण्यास आलेल्या मतदारांनाही आपण निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा भास होत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT