Birch Club Case Dainik Gomantak
गोवा

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

Luthra Brothers Bail Hearing: न्यायालयाने १३ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. सोमवारी सौरभ, गौरव आणि अजय या तिघांनाही कोलवाळ कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: ‘बर्च’ क्लबसाठी दारूविक्रीचा परवाना मिळविण्यासाठी आरोग्य खात्याचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सादर केल्याप्रकरणी संशयित आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सुनावणी तहकूब केली असून, मंगळवारी (ता. ६) जामीन अर्जावर पुढील युक्तिवाद होणार आहे.

या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी अजय गुप्ता यानेही न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सरकारी पक्षाचे म्हणणे आणि अंतिम युक्तिवादासाठी न्यायालयाने १३ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. सोमवारी सौरभ, गौरव आणि अजय या तिघांनाही कोलवाळ कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आले.

आगीच्या दुर्घटनेनंतर तक्रार

डिसेंबर २०२५ मध्ये ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या रेस्टॉरंट-क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ पर्यटक आणि कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हापसा पोलिसांत स्वतंत्र तक्रार दाखल केली होती.

क्लबचे संचालन करणाऱ्या एलएलपी कंपनीच्या संचालकांनी अबकारी खात्याकडून दारूविक्रीचा परवाना मिळविण्यासाठी आरोग्य विभागाचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तयार केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

२३०० पानी दोषारोपपत्र

या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे २,३०० पानांचे दोषारोपपत्र म्हापसा न्यायालयात दाखल केले आहे. क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्यासह दिनेश खेरा, अजय गुप्ता आणि अबकारी खात्याचे अधिकारी गौरेश गावस अशा पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT