Lumpy Disease | Dainik Gomantak
गोवा

Lumpy Disease: गोव्यात लम्पी पीडित गुरांसाठी विशेष विलगीकरण कक्ष

मंत्री नीळकंठ हळर्णकर- सिकेरी-डिचोलीतील गोशाळेत सोय

दैनिक गोमन्तक

Lumpy Disease: लम्पीची प्रकरणे राज्यात आढळली असून पशुसंवर्धन खात्याकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. लम्पी रोगाने पीडित गुरे आढळल्यास त्यांची सूचना खात्याला द्यावी. गोमंतक गोसेवक महासंघ या सिकेरी - डिचोली येथील गोशाळेने लम्पी रोगाने पिडीत गुरांसाठी विशेष विलगीकरण कक्ष तयार केला आहे.

या गुरांवर उपचार देखील येथे केला जात, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली. आपल्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

ही गोशाळा कमलाकांत तारी चालवत असून त्यांच्या गोशाळेत सुमारे दोन हजार गुरे आहेत. त्याशिवाय त्यांनी आणखी एक गोशाळा सुरू केली आहे. येथे लंपी पिडीत गुरांवर उपचार केला जातो. सरकारकडून गोशाळेला शक्य तेवढी मदत केली जात आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.

आपत्कालीन सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन खात्याने डॉक्टर्स नेमले आहेत. परंतु शेतकऱ्यांनी त्यांची गुरे आजारी असल्याचे फोन कॉल टाळले जात असल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना नाइलाजाने गुरांना गोवा डेअरीमध्ये घेऊन जाण्याची पाळी आली आहे.

त्यामुळे या पुढे फोन कॉल चुकवल्यास सुरुवातीला दोन वेळा ताकीद दिली जाईल आणि तिसऱ्यांदा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.

‘पशुसंवर्धन’तर्फे प्रयत्न

युवकांनी दुग्धव्यवसाय सुरू करावा, यासाठी पशुसंवर्धन खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी, या दृष्टिकोनातून डॉक्टर्स नेमण्यात आले होते.

परंतु शेतकऱ्यांना याचा लाभ होत नसेल, तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. यात डॉक्टर्सची भूमिका महत्त्वाची असून परिपत्रकाद्वारे ताकीद देण्यात आली आहे, असे हळर्णकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT