म्हापसा: मध्य प्रदेशातील महिला भावना चौहानच्या हत्येचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लव्ह ट्रँगलमधून ही हत्या झाल्याचे तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेमी युगुलाला अटक केलीय. भावनाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
धक्कादायब बाब म्हणजे आरोपींमध्ये मृताची नातेवाईक बहीण आणि तिच्या प्रियकराचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना प्रियकर राहुलवर लग्नासाठी दबाव टाकत होती, यातूनच तिची हत्या करण्यात आली. यानंतर दोघेही संशयित मृत भावनाची बॅग आणि मोबाईल घेऊन पळून गेले.
15 मार्च रोजी एक मुलगी आणि एक मुलगा कळंगुट येथील हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी रुम बुक केली आणि तिथे राहणाऱ्या महिलेची हत्या केली, अशी तक्रार अब्दुल नावाच्या व्यक्तीने 16 मार्च रोजी कळंगुट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गोवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिल्लीतील रहिवासी राहुल माहेश्वरी आणि इंदूरमधील बजरंग नगर येथील रहिवासी रश्मी सोलंकी या दोघांनी अटक केली.
मृत भावना ही घटस्फोटित होती. तिला ७ वर्षांचा मुलगाही आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय होती. यातून भावनाची राहुलसोबत मैत्री झाली. भावनाच्या माध्यमातून तिची नातेवाईक रश्मीही राहुलच्या संपर्कात आली. दरम्यान, रश्मी आणि राहुल यांच्यातील प्रेमसंबंध आणखी घट्ट झाले. भावनाला हा प्रकार कळताच तिने राहुलवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
भावना सतत राहुलवर लग्नासाठी दबाव टाकत होती. राहुलने लग्नाला स्पष्ट नकार दिला. दरम्यान, भावनाला ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जावे लागले. वैद्यकीय कामासाठी ती 7 मार्च रोजी खांडव्याहून मुंबईत पोहोचली. राहुल आणि रश्मी गोव्यात असल्याचे भावनाला कळताच तीही गोव्यात पोहोचली. इथेच हा हत्याकांड घडला.
भावना 14 मार्चला मुंबईहून थेट गोव्यात पोहोचली. तिने प्रियकर राहुल माहेश्वरीला लग्नाच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यास सांगितले.
15 मार्च रोजी राहुल आणि त्याची मैत्रीण रश्मी सोलंकी भावनाला भेटण्यासाठी ज्या खोलीत भावना राहत होती त्याच खोलीत गेले. त्यांच्यात बराच वेळ वाद सुरू होता. वादातून राहुल आणि रश्मीने १५ मार्च रोजी भावनाचा गळा आवळून खून केला आणि तिची पर्स आणि मोबाइल घेऊन पळ काढला.
16 मार्च रोजी खोलीचे दार उघडत नसल्याने हॉटेल मालकाला संशय आला. खोलीतून उग्र वासही येत होता. त्यानंतर हॉटेल मालकाने गोवा पोलिसांना माहिती देऊन खोली उघडली. खोलीत भावनाचा मृतदेह आढळून आला. गोवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची छाननी करून सखोल तपास केला. त्यानंतरच हे प्रकरण उघडकीस आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.