Love Dainik Gomantak
गोवा

Panjim: मुलीने प्रेमाला नकार देताच, माथेफिरु युवकाने उचलले धक्कादायक पाऊल

Panjim: ऑफिसमधील युवतीने त्याच्या प्रेमास नकार दिल्याने त्याने तिच्या नावाने फेक इस्टाग्राम अकाऊंट तयार केले.

दैनिक गोमन्तक

Panjim: ऑफिसमधील एक तरुण सहकारी युवतीच्या प्रेमात पडला. मात्र तिने त्याला दाद न दिल्याने तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. इंटरनेटवरून अश्‍लिल छायाचित्र काढत सहकारी युवतीच्या चेहऱ्याचा फोटो त्याला लावून ते व्हायरल केले. मात्र, हे कृत्य या आवारा मजनूला चांगलेच अंगलट आले असून सध्या तो पोलिस कोठडीची हवा खात आहे.

सुभाष सुरेश म्हापसेकर (29) असे संशयिताचे नाव आहे. ऑफिसमधील युवतीने त्याच्या प्रेमास नकार दिल्याने त्याने तिच्या नावाने फेक इस्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्याद्वारे इंटरनेटवरून अश्‍लिल छायाचित्रांना युवतीचा चेहरा क्रॉप करून तो व्हायरल करू लागला. ही बाब युवतीच्या लक्षात येताच तिने अज्ञाताविरोधात सायबर कक्षात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोध घेतला असता संशयित हा तिच्या ऑफिसमधील असल्याचे समजले. हे पाहून त्या युवतीला धक्काच बसला. दरम्यान, पोलिसांनी संशयितावर माहिती तंत्रज्ञान कलम 66सी, 67 तसेच 67 अ खाली गुन्हा दाखल करून अटक केली. महिला पोलिस निरीक्षक रिमा नाईक यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT