Vijay Marine shipyard blast Dainik Gomantak
गोवा

Lotulim Shipyard Accident: नौका बांधताना उडाला आगीचा भडका, 5 जणांचा मृत्यू; ‘विजय मरीन’ च्या संचालकासह दोघे अटकेत

Vijay Marine shipyard blast: शुक्रवारी १७ ऑक्‍टोबर रोजी या यार्डमध्ये नौका बांधणीवेळी वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक आगीचा भडका उडून सात कामगार होरपळे होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: रासई-लोटली येथील ‘विजय मरीन’ शिपयार्डमध्ये झालेल्या दुर्घटनाप्रकरणी या शिपयार्डचे संचालक हरेश चावला व सर्वेक्षक जिलन मुदगल या दोघांना अटक करण्‍यात आल्‍याची माहिती मायणा-कुडतरीचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली. मागाहून संशयितांना जामिनावर सोडण्यात आले.

शुक्रवारी १७ ऑक्‍टोबर रोजी या यार्डमध्ये नौका बांधणीवेळी वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक आगीचा भडका उडून सात कामगार होरपळे होते. त्यातील सेर अली महंमद अली व विनोद दिवान या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर, संतोष कुमार याला मागाहून गोमेकॉत मरण आले होते.

अभिषेक कुमार व मनीष चौहान या दोघांचा गोमेकॉत तीन दिवसांनंतर मृत्यू झाला होता. मोहम्मद बाबुल व सुरेंद्र कुमार या अन्य दोन कामगारांवर गोमेकॉत उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

शिपयार्डजवळ पोलिस पहारा

या दुर्घटना प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी सुरक्षा अधिकारी सुरेश बोरा याला अटक केली होती. नंतर तो जामिनावर सुटला होता. सध्या या शिपयार्डचे काम बंद ठेवण्यात आले आहे. तेथे पोलिस पहारा ठेवण्‍यात आल्‍याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली. दुर्घटनेनंतर कारखाने आणि बाष्पक खात्यांना यार्डमध्ये सुरक्षिततेची उपाययोजना दिसली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT