ice cream seller On Arambol Beach Dainik Gomantak
गोवा

Arambol Beach : फ्ली मार्केट गेले; मसाजवाले ‘जैसे थे’!

हरमल किनाऱ्यावरील स्थिती : पोलिसांना कारवाईसाठी मिळेना मुहूर्त

दैनिक गोमन्तक डिजिटल

येथील किनारी भागात विदेशींचे फ्ली मार्केट वाल्यांना हाकलून लावण्यात यश आले. मात्र, लमाणी फिरते विक्रेते, आईस्क्रीम विक्रेते, मसाजवाले तसेच अन्य वस्तू विकणाऱ्यांना हाकलून लावण्यासाठी,पोलिस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा प्रश्‍न स्थानिकांतून विचारला जात आहे.

हरमल किनाऱ्यावर सध्या लमाणी महिला, खेळणी ते खाऊच्या प्लास्टिक बंद पिशव्या घेऊन काहीजण विक्री करीत असल्याचे चित्र दिसते. त्यापैकी काही मसाजवाले थेट पर्यटक बसतात, तिथे जाऊन मसाज करतात, काहीजण हात साफ करण्याच्या हेतूने किनाऱ्यावर वावरत असतात.

किनारी भागांत परप्रांतीय लोकांचा मोठा गट असून पोलिसांना ते दाद देत नसल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे पोलिस थेट कारवाई करणे टाळतात, असे एकाने सांगितले. वास्तविक किनाऱ्यावर विदेशी लोकांच्या फ्ली मार्केटला आक्षेप घेऊन ते मार्केट बंद पाडले, हे योग्य झाले.

मात्र फिरत्या विक्रेत्यांना बंदी घालण्याची कारणे कोणती, असा सवाल काहीजण करीत आहेत. लमाण्यांना व्यवसाय करण्यावर बंदीची मागणी व्यावसायिकांनी कित्येकदा करूनही पोलिसांनी कानाडोळा करण्या मागे ''अर्थपूर्ण'' कारण असल्याचे सांगून काही व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.

आईस्क्रीम विक्रेत्यांची मुजोरी !

हरमल किनाऱ्यावर आईस्क्रीमचे गाडे थेट किनाऱ्यावर उभे करून विक्रेते पोलिसांना वाकुल्या तर दाखवीत नाही ना, अशी चर्चा चालू आहे. या पर्यटन हंगामात किमान 7 हातगाडे पाण्यापर्यंत लावून पोलिस आपल्याला हात लावू शकणार नाहीत,असा संदेश व मुजोरपणा आईसक्रिम तसेच फ्रूट विक्रेते देत असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

SCROLL FOR NEXT