Calangute Beach, Goa Dainik Gomantak
गोवा

Calangute: आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू रानांत फसलंय, रस्ता चुकलंय! ताटातूट झालेल्या मायलेकरांची कळंगुट किनाऱ्यावर झाली पुर्नभेट

Calangute Goa News: किनाऱ्यावरील सूचना प्रणालीवरुन माहिती देताच समुद्रकिनाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या आईने घटनास्थळी धाव घेतली.

Pramod Yadav

म्हापसा: गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांची अनेकवेळा चुकामूक होते. विशेषत: लहान मुले समुद्रकिनाऱ्यावरील गर्दीत चुकतात. चुकामूक झालेल्या पर्यटकांची पुर्नभेट घडवण्यासाठी पर्यटक पोलिस महत्वाची भूमिका बजावतात. अशाच एका घटनेत कळंगुट किनाऱ्यावर ताटातूट झालेल्या मायलेकांची पोलिसांनी पुर्नभेट घडवून आणली आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर एक लहान मुलगा एकटाच असल्याचे पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीत तो आई पासून चुकल्याचे पोलिसांना समजले. पर्यटक पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन, किनाऱ्यावरील सूचना प्रणालीवरुन माहिती दिली. दरम्यान, कळंगुट समुद्रकिनाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या आईने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी सर्व माहितीची पडताळणी करुन मायलेकरांची भेट घेडवून आणली. राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी. चुकामूक झाल्यास जवळच्या पोलिस स्थानकांशी किंवा पर्यटक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

केरळमधून बेपत्ता झालेली तीन अल्पवयीन मुले गोव्यात सापडली

केरळमधून बेपत्ता झालेली तीन अल्पवयीन मुले मडगाव रेल्वे स्थानकावर आढळून आली आहेत. कोकण रेल्वे पोलिसांनी तिघांच्या चौकशीअंती त्यांची मेरशी येथील अपना घर येथे रवानगी केली आहे. तीन मुले केरळ येथून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT