Fire Brigade Dainik Gomantak
गोवा

Fire News: सत्तरी तालुक्‍यात 3 ठिकाणी आग

Fire News: लाखोंची हानी : धारखंड, वाघुरे, केरीत पळापळ

दैनिक गोमन्तक

Fire News:

सत्तरी तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांमध्ये विविध ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. धारखंड येथे काजू बागायतीला आग लागून सुमारे पाच लाखांची नुकसानी झाली. केरी येथील संगणकाचे दुकान जळाल्‍याने दोन लाखांची हानी झाली. तर, वाघुरे व पिसुर्ले येथील खाण परिसरात आग लागून वन्‍यसंपत्तीचे नुकसान झाले आहे.

धारखंड येथील अंकुश कुडशेकर यांच्या काजू बागायतीला दोन दिवसांपूर्वी अचानक आग लागली. त्‍यांनी स्थानिकांना सोबत घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आले.

दलाने तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. पण तोपर्यंत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झालेच. दलाने सुमारे 10 लाख रुपयांची मालमत्ता वाचविली.

दुसऱ्या घटनेत केरी-सत्तरी येथील देवेंद्र गावस यांच्या कंप्‍युटर यंत्रणेला अचानक आग लागून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.

आग लागल्‍याचे समजताच नागरिकांनी ती विझविण्‍यासाठी प्रयत्‍न केले. तरीसुद्धा यंत्रणेमधील कंप्‍युटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर, लॅपटॉप जळाले. त्‍यामुळे गावस कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

तिसऱ्या घटनेत वाघुरे येथे खाण परिसरातील काजू बागायती व जंगल संपत्तीला आग लागली. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र काही झाडे आगीच्या भक्षस्थानी पडलीच. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्‍यान, सत्तरी तालुक्‍यातील माळरानावर, जंगलात आग लागण्‍याच्‍या घटना पुन्‍हा घडू लागल्‍याने नागरिकांमध्‍ये चिंता व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT