Margao Railway Station Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station: मडगाव येथील रेल्वेस्थानकावर लूटमार; तब्बल नऊ महिन्‍यांनंतर गुन्‍हा नोंद

Margao Railway Station: युवकाला रात्रीच्‍या वेळी लुटले

दैनिक गोमन्तक

Margao Railway Station:

मडगाव येथील रेल्वेस्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर चार अज्ञात युवकांकडून मारहाण करत मिथुन राज के. के. यांना लुटण्याचा प्रकार घडला. तसेच त्‍यांना एटीएममधून पैसे काढायलाही भाग पाडले.

तक्रारीनंतर कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. मडगाव रेल्वेस्थानक परिसरात परराज्यांतून आलेले अनेक लोक वस्ती करतात.

याचा त्रास आता प्रवाशांना होऊ लागला आहे. प्लॅटफॉर्मवर कुणीही नसल्याचे पाहून रात्रीच्या वेळी लुटमारीचे प्रकार घडत आहेत. वरील घटना २५ मे २०२३ रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली होती.

मात्र या प्रकरणात आता गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. या प्रकारानंतर मिथुन याने पोलिसांत तक्रार नोंद केली.

त्‍यास अनुसरून कोकण रेल्वे पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह कोकण रेल्वे पोलिस तपास करत आहेत.

बुक्क्यांनी मारहाण करून माजवली दहशत

तक्रारदार मिथुन राज के. के. (३३, रा. केरळ) हा युवक मडगाव रेल्वेस्थानकावरून स्वामी विवेकानंद रेल्वे हॉलिडे होमकडे जात होता. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर कुणीच नसल्याची संधी साधून २० ते ३० वर्षे वयोगटांतील चार युवकांनी अडविले व पैशांची मागणी केली.

ते देण्यास नकार दिल्याने बुक्क्यांनी मारहाण करत त्‍याच्‍या पाकिटातील १ हजार रुपये व रेल्वे इमर्जन्‍सी पास जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर मिथुनला एटीएमकडे नेत ५ हजार रुपये काढायला लावले. हे सर्व पैसे घेऊन त्‍यांनी पलायन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT