Goa Tourism | Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याला येण्यापूर्वी ऑनलाईन माहिती पाहतायं? मग ही बातमी वाचाच; नाहीतर...

पर्यटनविषयक वेबसाईट्सना सायबर गुन्हेगारांचा विळखा

Akshay Nirmale

Goa Tourism: देशाची पर्यटन राजधानी म्हणून गोव्याची ओळख आहे. देशभरातील पर्यटकांची पर्यटनासाठी पहिली पसंती गोव्याला असते.

त्यासाठी आधी वेबसाईट्सवर जाऊन माहिती पाहिली जाते, बऱ्याचदा बुकिंगदेखील केले जाते.

तुम्ही, देखील असेच करत असाल तर थोडं थांबा. कारण, पर्यटकांच्या याच सवयीचा फायदा आता सायबर गुन्हेगार घेत असल्सयाचे समोर आले आहे. त्यातून पर्यटकांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे.

सायबर गुन्हेगारांनी सुप्रसिद्ध पर्यटनविषयक वेबसाईट्स प्रमाणेच फेक वेबसाईट तयार केल्या आहेत. पत्ता आणि संपर्क क्रमांक बदलून एकसारख्या दिसणाऱ्या वेबसाईट्स डिझाईन केल्या आहेत. प्रसिद्ध वेबसाईट्सची नावे आणि त्यावरील फोटोजदेखील खऱ्या वेबसाईट्वरून कॉपी करून लावलेले आहेत.

त्यामुळे कुणाही पर्यटकाचा अशा वेबसाईटवर विश्वास बसू शकतो. त्यातूनच अनेक पर्यटकांना गोव्यातील पर्यटनाच्या पॅकेजचे बुकिंग देऊन, त्यासाठी पैसे भरून घेऊन त्यांची फसवणूक केल्याची उदाहरणे समोर येत आहेत.

काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. देशाच्या विविध भागातील पर्यटक अशा फसवणुकीला बळी पडलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पर्यटनाच्या आनंदावर विरजण तर पडलेलेच आहे, पण आर्थिक फटकाही सहन करावा लागला आहे.

गोवा पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने अशा तक्रारीही दाखल केल्या आहेत. त्यानुसार सायबर गुन्हेगारांनी गोव्यातील ट्रॅव्हल एजन्सीच्या ब्रँड, लोगो यांचाही गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. त्यातून फ्लाइट तिकीट आणि हॉटेल बुकिंगसाठी पैसे आकारले जात आहेत.

घोटाळेबाज नंतर ग्राहकांना बनावट विमान तिकिटे आणि हॉटेल आरक्षणाचा तपशील जारी करतात आणि नंतर कॉलला प्रतिसाद देणे थांबवतात. ऑनलाईन तिकीट बुकिंग घोटाळ्यालाही अनेक पर्यटक बळी पडले आहेत.

अनेक हॉटेल्सनाही असे झाल्याचे आढळून आले आहेत. ऑनलाईन शोधल्यावर पत्ते आणि संपर्क क्रमांक बदलल्याचे अनेक हॉटेल्सच्या लक्षात येत आहे.

दरम्यान, नुकतेच गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने याबाबत सतकर्ता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

SCROLL FOR NEXT