Long Que in Madgaon for South Goa District court recruitment  Dainik Gomantak
गोवा

Government Job in Goa : मडगाव कोर्टात 115 जागांसाठी हजारों उमेदवारांचे अर्ज

कर्मचारी भरती : दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयीन आवारात लांबच लांब रांगा

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : दक्षिण गोवा न्यायालयात 115 कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. या 115 जागांसाठी हजारो तरुण तरुणी अर्ज भरण्यासाठी मडगावात दाखल झाले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात सकाळपासूनच लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. ऊन पावसाच्या लपंडावात लांब रांगेत उभे राहिलेल्या तरुणांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झाले.

दक्षिण गोवा न्यायालयातील रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज देण्यासाठी हजारो युवा युवतींनी न्यायालयीन आवारात रांग लावली होती. दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायालयाने 15 दिवसांपूर्वी न्यायालयात कारकून आणि अन्य पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यासाठी अर्ज भरण्यासाठी आज अंतिम तारीख होती. आज सकाळपासून उमेदवारांची रांग कोर्टाच्या आवारात सुरू झाली होती. पावसाची पर्वा न करता हे युवक रांगेत उभे होते. दुपारपर्यंत ही गर्दी कमी झाली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT