Canacona  Dainik Gomantak
गोवा

Canacona News : ‘लोलये’ची ग्रामसभा ढकलली पुढे; ग्रामस्थांचा होता आक्षेप

Canacona News : काही भागधारक सभेपासून वंचित राहू नयेत म्हणून निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News : काणकोण, लोलये कोमुनिदाद संस्थेची बैठक व लोलये पंचायतीची ग्रामसभा एकाच दिवशी बोलविण्यात आली असल्याने त्या निर्णयाला काही ग्रामस्थांनी व कोमुनिदाद संस्थेच्या काही भागधारकांनी आक्षेप घेतला होता.

त्यानुसार लोलये-पोळे पंचायतीने रविवारी (ता.४) सकाळी १० वाजता निश्चित केलेली ग्रामसभा पुढे ढकलली आहे.

लोलये कोमुनिदाद संस्थेची बैठक रविवारी सकाळी १०.३० वाजता व लोलये पंचायतीची ग्रामसभा रविवारी सकाळी १० वाजता बोलविण्यात आली होती. एकाच दिवशी दोन्ही सभा बोलविण्यात आल्याने भगवती पठारावर फिल्म सिटीला विरोध करणार्ऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला होता. त्यामुळे ग्रामसभा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली होती.

एकाच दिवशी एकाच गावात फिल्म सिटीसारखा संवेदनशील विषय असताना ग्रामसभा कशी बोलविण्यात येते. यासंबंधी कोमुनिदादचे एक भागधारक ओम प्रभू गावकर यांनी आक्षेप घेतला होता.

दरम्यान, फिल्म सिटीला विरोध होत असताना एकाच दिवशी पंचायतीने सभा आयाेजित करण्यामागे मोठे राजकारण असल्याचे परिसरात बोलले जात आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न?

लोलये कोमुनिदादीने ४९४ एकर जमीन विन्ड मिल पार्क सुरू करण्यासाठी डब्ल्यूएसएफ या कंपनीला भाडेपट्टीवर देण्याचे ठरविले आहे‌.

त्याशिवाय २५० एकर जमीन ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर फिल्म सिटी उभारण्यासाठी मनोरंजन सोसायटीला देण्याचे कोमुनिदादीच्या गेल्या बैठकीत एका ठरावाद्वारे ठरविण्यात आले होते. मात्र, या निर्णयाला काही कोमुनिदाद भागधारकांचा विरोध आहे.

त्यांनी या ठरावाला विरोध केला होता. मात्र, त्यांची नोंद ठराव वहीत केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे दोन्ही विषय ग्रामसभेत गाजणार होते.

त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लोलये येथे निर्माण होणार असल्याची कुणकुण प्रशासनाला लागल्याने पूर्वनियोजित ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली असल्याचे मानण्यात येते.

लोलये कोमुनिदादचे काही भागधारक ग्रामसभेपासून वंचित राहू नयेत म्हणून ग्रामसभा पुढे ढकलली.

कोमुनिदादचे बहुतेक भागधारक ग्रामसभेचे सदस्य असल्याने त्यांना दोन्ही सभांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामसभेची नवीन तारीख गटविकास अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ठरविण्यात येणार आहे.

- निशा च्यारी, सरपंच, लोलये-पोळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT