Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco News : कुठ्ठाळीच्या जनतेचा पल्लवी धेंपेंनाच पाठिंबा : आंतोन वाझ

Vasco News : भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचे कुठ्ठाळी भाजप मंडळातर्फे भव्य स्वागत करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, राज्य सरकारने मी अपक्ष आमदार असलो तरी माझ्यावर कधीच अन्याय केला नाही. मला माझ्या मतदारसंघात विविध कामे करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करीत आहे.

कुठ्ठाळी मतदारसंघात अनेक विकासकामांना चालना मिळाली असल्याने कुठ्ठाळीच्या जनतेचा भाजप लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना पूर्ण पाठिंबा मिळणार आहे, अशी ग्वाही आमदार आंतोन वाझ यांनी दिली.

भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचे कुठ्ठाळी भाजप मंडळातर्फे भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, माजी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तथा सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक, कुठ्ठाळी भाजप गटाध्यक्ष नारायण नाईक, कुठ्ठाळीच्या सरपंच सानिया परेरा, मुरगावचे नगरसेवक तथा वास्कोचे गटाध्यक्ष दीपक नाईक, राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत गावस, गिरीश बोरकर उपस्थित होते.

‘सरकारच्या सहकार्यामुळेच कुठ्ठाळीचा विकास’

आमदार आंतोन वाझ यांनी सांगितले की, राज्य सरकारने विकासकामांत गोव्याला अग्रस्थानी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कुठ्ठाळीचा विकास झपाट्याने होत असून यात राज्य सरकारचा महत्त्वाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपचा विजय पक्का असल्याचा दावा त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT