Amit Shah In Goa
Amit Shah In Goa Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Manish Jadhav

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसप्रणित इंडिया अलायन्सने भाजपचा (BJP) हा विजयीरथ रोखण्यासाठी जोर लावला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गोव्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेसवर शरसंधान साधले होते. काँग्रेस (Congress) केवळ तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला केला होता. येत्या 7 तारखेला देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशातच, आज गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गोव्यात प्रचारसभा घेत काँग्रेसवर तोफ डागली. शाह यांनी आज म्हापसामध्ये (Mapusa) विराट जनसमुदयाला संबोधित केले.

शाह म्हणाले की, ‘’येत्या 7 तारखेला होत असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात तुम्ही विक्रमी मताधिक्याने मतदान करा. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपो यांना तुम्ही दिलेले मत थेट पंतप्रधान मोदींना मिळणार आहे. एकीकडे भ्रष्टाचाराने लिप्त असलेली इंडिया आघाडी आहे तर दुसरीकडे, 23 वर्ष एका राज्याचे मुख्यमंत्री आणि दहा वर्ष पंतप्रधान राहून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. एक सच्चे राष्ट्रभक्त पंतप्रधान मोदी आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदावर असताना मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही. मात्र दुसरीकडे, राहुल गांधी आहेत जे सुट्टी घेऊन परदेशात फिरायला जातात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे.’’

‘’दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास केला आहे. मागील 30 वर्षात देशाने 80 सरकारे पाहिली. त्याचे परिणामही भोगले. परंतु गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदी खंबीररित्या देशाचे नेतृत्व करत आहेत.’’ असेही शाह पुढे म्हणाले. दरम्यान, पुन्हा एकदा कोरोनासारखं संकट आलं तर हे इंडिया आघाडीचे लोक देशाला सुरक्षित करु शकतील का? पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर वचक ठेवू शकतील का? नक्षलवाद समाप्त करु शकतील का? असे अनेक सवाल यावेळी शाह यांनी विचारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंक्रीमेंट-प्रमोशन न दिल्याचा आरोप... 'या' कंपनीला मोठा झटका; आता द्यावे लागणार 1 अब्ज!

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

SCROLL FOR NEXT