Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao: ''माझे मत सेक्‍युलर पार्टीलाच, पण काँग्रेसला...''; आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

Lok Sabha Election 2024: बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आपण आजवर ‘सेक्‍युलर’पार्टीलाच मतदान करत आलो आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Benaulim MLA Churchill Alemao: बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आपण आजवर ‘सेक्‍युलर’पार्टीलाच मतदान करत आलो आहे. त्‍यामुळे यावेळीही माझे मत काँग्रेसलाच असेल असे स्‍पष्‍ट केले. मात्र काँग्रेसला माझी गरज आहे की नाही? हे मला माहीत नाही, असेही ते म्‍हणाले.

दरम्यान, वार्का येथील निवासस्‍थानी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना आलेमाव यांनी काँग्रेसवर नाराजी व्‍यक्‍त केली. काँग्रेसला जर माझी गरज असती, तर त्‍यांनी मला बाणावली येथे झालेल्‍या सभेत प्रचारासाठी बोलविले असते. पण मला सभेचे कोणीही आमंत्रण दिले नाही. मीही इंडिया आघाडीचा घटक असे त्‍यांना वाटत नाही का? असा सवाल आलेमाव यांनी केला.

दक्षिण गोव्‍यात कुणाचे पारडे जड आहे, असे त्‍यांना विचारले असता, मी दिल्‍लीत होतो, त्‍यामुळे यावेळी कुणाच्‍या बाजूला वारे आहे, ते कळत नाही. सासष्‍टी तालुक्‍यातील मते काँग्रेसच्‍या बाजूला असतील, यात दुमत नाही. पण काँग्रेस उमेदवाराला हिंदू मते किती पडतील? त्‍यावरच त्‍यांचा विजय होईल, की पराजय हे स्‍पष्‍ट होणार. भाजपच्‍या उमेदवार पल्‍लवी धेंपे यांचे यजमान श्रीनिवास धेंपे यांचा फुटबॉल क्‍लब आहे. सासष्‍टीतील कित्‍येक खेळाडू त्‍यांच्‍या क्‍लबमधून खेळले आहेत. या खुळाडूंचा त्‍यांना पाठिंबा असू शकेल, असे ते म्‍हणाले.

काँग्रेस उमेवाराला मतदान करा, असे तुम्‍ही तुमच्‍या समर्थकांना सांगितले का? असे आलेमाव यांना विचारले असता, माझे समर्थक हुशार आहेत, त्‍यांना कुणाला मतदान करायचे आहे, ते त्‍यांना माहीत आहे, असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT