Lohia Ground  Dainik Gomantak
गोवा

लोहिया मैदानावर होणार यंदाचा क्रांतिदिन?

नूतनीकरणाची धावपळ; प्रशासनाकडून मंडप उभारणी सुरू

दैनिक गोमन्तक

मडगाव : क्रांतिदिनापूर्वी म्हणजे 18 जूनपूर्वी मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानाचे नूतनीकरण पूर्ण करण्यासाठी सध्या संबंधितांची धावपळ सुरू आहे. पावसाने घेतलेली उसंत त्यांना सहाय्यक ठरलेली असली तरीही खरेच हे काम त्यापूर्वी पूर्ण होणार का, असा प्रश्न केला जात आहे.

एक गोष्ट खरी की नूतनीकरणाचे संपूर्ण काम होवो किवा नसो,यंदांचा क्रांतिदिन लोहिया मैदानावर साजरा होणार हे नक्की. त्यासाठी तेथे भव्य मंडप उभारणीचे काम सुरु झालेले आहे. शासकीय पातळीवरील या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणेने पावले उचलली आहेत.

सदर दिवशी सरकारतर्फे कोण उपस्थित राहणार ते जरी अजून जाहीर झालेले नसले तरी अन्य तयारी सुरू झालेली आहे. वर्षभरापूर्वी मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामास सुरुवात झालेली असली तरी अनेक मुद्द्यावरून हे काम सुरुवातीपासून चर्चेत राहिले.

नंतर ते बाजूला राहिले पण नंतर लोहिया पुतळ्याच्या चौथऱ्याची कमी उंची, व्यासपीठावरील दरवाजा ,मैदानावरील ट्रान्सफॉर्मर केंद्र हे मुद्दे पुढे आणले गेले. त्यावर तोडगा काढताना चौथऱ्याची उंची वाढवून पुतळा बसवला गेला तसेच व्यासपीठावरील दरवाजा बंद केला गेला आहे.

सर्व काम ठरल्या वेळेत पूर्ण करुन मैदान नगरपालिकेच्या स्वाधीन केले जाईल असे ‘जी-सुडा’च्या सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT