Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: पर्यटन हंगाम सुरळीत कर रे महाराजा! स्थानिकांकडून दूधसागर देवाला सामूहिक गाऱ्हाणे

Dudhsagar Waterfall Goa: दूधसागर हंगामाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य करुन सारं काही सुरळीत होण्यासाठी स्थानिकांकडून दूधसागर देवाला सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

Dudhsagar Waterfall, Goa

कुळे: दूधसागर टूर ऑपरेटर्स तर्फे गोवा पर्यटन विकास मंडळाने सुरू केलेला काउंटर बंद करण्याची मागणी केली जातेय, मात्र अजूनही इथे पर्यटन हंगामाची सुरुवात करण्यात आलेली नाही, म्हणूनच दूधसागर हंगामाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य करुन सारं काही सुरळीत होण्यासाठी स्थानिकांकडून आज( दि. २७ ऑक्टोबर) रोजी दूधसागर देवाला सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.

दूधसागरावरील जीप मालकांचा प्रश्न अद्याप सरकारने सोडवलेला नाही. कुळे येथील दूधसागरावर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी गोवा पर्यटन मंडळाने सुरु केलेला काउंटर बंद करावा अशी मागणी जीप मालकांकडून केली जातेय, मात्र अजूनही यावर सरकारे ठोस अशी कारवाई केलेली नाही, म्हणून दूधसागर टूर ऑपरेटर्सच्या जीप चालकांनी एकत्र येत दूधसागर देवाला गाऱ्हाणे घातले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश वेळीप, सचिव नंदिश देसाई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. एवढंच नाही तर दूधसागराला गाऱ्हाणे घालताना भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर व अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

१०० रुपये कमी करण्याचा निर्णय:

भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी टूर ऑपरेटर्सना पाठिंबा देत पर्यटन विकास मंडळाने सुरू केलेला काउंटर बंद करण्याची मागणी केली होती आणि यावर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थानिक आमदार गणेश गावकर यांच्यासोबत बैठक घेत काउंटर बंद न करता १०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला होत मात्र हा निर्णय स्थानिक जीप मालकांना मान्य नसल्याने त्यांनी विरोध सुरूच ठेवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT